सातारा : एमआयडीसीमधील प्लॉटवर सर्व्हीस चार्जची थकबाकी कमी केल्याच्या मोबदल्यात व त्या प्लॉटवरील नो ड्युजचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी सातारा एमआयडीसी कार्यालयाचा लिपिकाला अटक करण्यात आली आहे. सदर लिपिकाने 13 हजार रुपयांची लाच मागितली होती.
याप्रकरणी सातारा एमआयडीसी कार्यालयाचा लिपिक महादेव गोविंद पाटील (वय 42, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर ता. कडेगाव जि.सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केली. दरम्यान, एमआयडीसीमधील गेल्या 15 दिवसातील ही दुसरी कारवाई असून दोन्ही प्रकरणातील तक्रारदार एकच आहे.