सातारा : जागतिक पशुसंक्रमित आजार दिनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत येथील राजवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आयोजित केलेल्या मोफत रेबीज विरोधी लसीकरण शिबिराला श्वान आणि मांजरप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण १३५ रेबीज पाळीव प्राण्यांना विरोधी लसीकरण करण्यात आले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. सुनील देशपांडे म्हणाले, आपल्या घरातील कुत्रा मांजर या प्राण्यांना रेबीज विरोधी लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्या प्राण्याचा मालक आणि प्राणी हे दोन्ही सुरक्षित राहू शकतात. जागतिक पशुसंक्रमित आजार दिनानिमित्त आयोजित या लसीकरण मोहिमेला श्वान आणि मांजर पालकांचा विशेष प्रतिसाद लाभला. आपल्या पाळीव प्राण्यांना वेळोवेळी लसीकरण करावे, असे आवाहनही डॉ. देशपांडे यांनी केले. यावेळी शहर आणि परिसरातील सुमारे १३५ कुत्रा अणि मांजर या पाळीव प्राण्यांना लसीकरण करण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. नंदकुमार पाटसुते, तन्मय आढाव, गुरुराज कुमकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहाय्य केले.