सातारा – कराडच्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (कृष्णा हॉस्पिटल) कोव्हिड-१९ ची चाचणी करण्यास ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.

सातारा जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आता तर ५२ वर पोहोचली आहे. या आधी संशयित रुग्णांचे स्त्राव पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात येत होते. अशा स्थितीत कराडमधील क्रुष्णा हाँस्पिटलला कोव्हिड-१९ ची चाचणी करण्यास मान्यता मिळाल्याने जिल्ह्याला खास करून कराडला दिलासा मिळाला आहे .