Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीआरती बनसोडे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

आरती बनसोडे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव

वडूज : डांभेवाडी (ता. खटाव) येथील रहिवाशी व भांडुपस्थित समाजशिक्षीका आरती विनोद बनसोडे यांचा पनवेल येथील पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरणाच कार्यक्रम झाला. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सौ. बनसोडे यांनी मुले, मुली, महिला व समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा या माध्यमातून केलेल्या विधायक कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. मानवस्त्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते. सी. एस. थुल, विजयकुमार गवळी, गजानन पाटील, संतोष घरत, संघटनेचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश खराडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.
सौ. आरती या डांभेवाडीचे माजी सरपंच कृष्णराव बनसोडे यांच्या सुनबाई तर जॅग्वार मोटर्सचे विक्री व्यवस्थापक विनोद बनसोडे यांच्या पत्नी आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे भांडुप परिसर तसेच खटाव-माण तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular