Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीआसले याठिकाणी कृषिदूतांचे आगमन

आसले याठिकाणी कृषिदूतांचे आगमन

भुईंजःशासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील चतुर्थ वर्षात शिकत असलेले कृषिदूत यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शिकत असलेले कृषिदूत सुरज चौगुले़ मंथन देवकाते़ शुभम गणदास़ शुभम गटकुऴ गणेश चाबुकस्वार आणि अमोल लोखंडे यांनी आसले ता.वाई येथे शेतर्कयांना आधुनिक शेती़ नवीन तंत्रज्ञाऩ नवनवीन संकल्पना प्रात्यक्षिक दाखवून विषयी माहिती दिली. याप्रसंगी आसले गावातील अनेक शेतकरी यांनी यामध्ये हजर राहून सहभाग घेतला.
कृषिदूतांचे स्वागत आसले गावचे सरपंच अनिल चव्हाण यांनी केले. याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी सौ.ढमाऴ गावचे कृषि सहाय्यक यमगऱ तलाठी संकेत साळुंखे व ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि सहाय्यक यमगर यांनी केले या कृषिदूतांना शासकीय कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.आर.सुर्यवंशी़ केंद्राध्यक्ष डॉ.एस.एस.शिर्के़ प्रा.कृषितंत्र विद्यालय बोरगाव़ डॉ.डी.एस.नावडकऱ ग्रामीण कृषि कार्यानुभव समन्वयीक सहयोगी प्राध्यापक शासकीय कृषि महाविद्यालय कराड डॉ.पि.बी.पवार यांचे सहकार्य लाभले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular