Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातारा रयत शिक्षण संस्थे समोरील पार ऐतिहासिकच

सातारा रयत शिक्षण संस्थे समोरील पार ऐतिहासिकच

सातारा : सातारा रयत शिक्षण संस्थेच्या इमारती समोरील पारात दडलंय काय असे वृत्त दैनिक महासत्ताने प्रसिध्द केले होते. सातारा नगरपालिकेच्यावतीने रयत समोरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्यात आली. संबधित पाराच्या ठिकाणी खोदकाम केले असताना या पारावर दर्शनी भागात दोन शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत माहिती घेतल्यानंतर या पाराचे ऐतिहासिक महत्व वादादित असल्याचे निष्पन्न झाले. सातार्‍यातील जिज्ञासू व इतिहास संशोघकांच्या सोबतच सातारा गॅझेटिअर मधून मिळालेल्या माहितीनुसार
रयत समोरील पारात नक्की दडलंय काय? याबाबतच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून याबाबतचा उलघडा झाला. या पाराचा रयत शिक्षण संस्थेच्या बांधकामाशी संबध नसून त्याहीपेक्षा जुन्या अशा सातार्यात घडलेल्या ऐतिहासिक घटनेशी आहे. याची नोंद सातारा गॅझेटिअर मध्ये आजही आढळते. अठराशे सत्तावन्न च्या दरम्यान श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना ब्रिटिश सरकारने खोट्या आरोपाखाली राजगादी वरून पदच्युत करून त्यांची रवानगी बनारस येथे म्हणजेच काशीला केली त्यानंतर सातारा गादीचे वारस म्हणून श्रीमंत छत्रपती आप्पासाहेब महाराज उर्फ शहाजीराजे गादीवर आले आप्पासाहेब महाराजांच्या कारकिर्दीत सातार्‍यात बर्‍याच सुधारणा झाल्या सातार्‍यात काही ठिकाणी हौदांची उभारणी झाली. ओढ्यांवर ,नदीवर पूल बांधले गेले माहूलीचा ऐतिहासिक पूल हा देखील त्यांच्या कारकीर्दीतला आहे. तत्कालीन ब्रिटीश अधिकारी रिजंन्ट बार्टलर फ्रिअरे याने सातारची घडी बसवीण्यासाठी 18 व्या शतकात मोठे योगदान दिले होते . याच बार्टलर फ्रिअरेच्या नावाने व शहाजी उर्फ आप्पा महाराज यांच्या स्मृती प्रत्यर्थ सध्याच्या कर्मवीर स्मारकाच्या समोरील पारावर एक अन्नसत्र चालवण्यात येई . अंध , असहाय , पंगू लोकांसाठी येथून धान्य वाटप करण्यात येई आणि विशेष म्हणजे या गोष्टीची स्मृती चिरंतन रहावी म्हणून तशा आशयाचे दोन शिलालेख ही या पारावर बसवलेले ते आपल्याला आजही पहायला मिळतात. या शिलालेखां पैकी एक शिलालेख मराठीत असून त्याचा दुसरा शिलालेख इंग्रजीमध्ये आहे. आधुनिक सातारा शहराच्या जडण-घडणीत एक मैलाचा दगड ठरणार्‍या घटनेचा साक्षीदार म्हणून या पाराचे महत्व वादातीत आहे.
सातारा शहरात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे भविष्यातील 50 वर्षाचा वाहतुकीचा प्रश्‍न सुटनार आहे. रस्ते रूंदीकरण ही काळाची गरज बनली असताना. रस्ता रूंदीकरणासाठी बाधीत ठरणार्‍या रयत समोरील पाराबाबत नगरपालिका प्रशासन व बांधकाम विभागाच्या वतीने नेमकी कारवाई काय होणार याकडे लक्ष लागले असताना. इतिहासप्रेमी, तसेच जिज्ञासू, व सातारकर नागरिकांनी या ऐतिहासिक पण रस्ता रूंदीकरणाला बाधित ठरत असणार्‍या पाराचे संवर्धन करणार नसाल तर किमान या शिलालेखांची जबाबदारी सातार्‍यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाकडे सोपवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सातारा शहरात दिसली जागा टाक टपरी अशी अवस्था आज दिसत असताना पालिकेची अतिक्रमण कारवाई ही एकाला हाताशी व दुसर्‍याला पायाशी अशी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. यामध्ये सातार्‍यांतील ऐतिहासिक वास्तू, स्मृतिस्थळे यांचे संवर्धन पालिका करणार का असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. शहरात नागरिकांना सोई सुविधा उपलब्ध करून देत असताना एका बाजूला स्वकिय आप्तेष्ठांचे हितसंबध जपताना दुसरीकडे शहराला बकालीकडे घेवून जात असल्यामुळेच अनेक वास्तू, वस्तू, व ऐतिहासिक ठेव्याची दुर्देशा झाली आहे. हा पार काढला जाणार का राहणार हा प्रश्‍न आता उरला असून. या ऐतिहासिक ठेव्याबाबत नगरपालिका तसेच बांधका विभाग काय करणार याबाबत आला सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular