औंध: चोराडे फाटा ते रायगाव रस्त्यावर विनापरवाना, अवैद्यरित्या वाळू वाहतूक करणार्या दोन ट्रकवर कारवाई करून वाळूसह सुमारे एकतीस लाख रुपयाचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास औंध पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चोराडे फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना मायणी येथील नदीपात्रातून अवैध्यरित्या वाळू भरुन कराडकडे निघालेल्या ट्रक क्रमांक चक 50 2107 वर कारवाई करून दोन्ही ट्रक वाळूसह औंध पोलिसांनी जप्त केले आहेत. तसेच ट्रक चालक भिमाशंकर चव्हाण वय 29 रा.हिपनाळ हिटगी ता.सिंदगी जि.विजापूर, हल्ली सैदापूर ता.कराड व दुसरा ट्रक चालक गोपाळ बन्नेनवर वय 23 रा.गोवारे ता.कराड यांच्यासह ट्रकमालक अमोल बाळासो देशमुख रा.गोवारे या तिघांवर विनापरवाना वाळू वाहतूक करणे, लायसन्स न बाळगणे, बेकायदेशीर पणे गौण खनिज उत्खनन करणेयातंर्गत कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन ट्रक दहा ब्रास वाळू असा सुमारे तीस लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज औंध पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रशांत पाटील यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास सपोनि सुनील जाधव करीत आहेत.
अवैद्यरित्या वाळू वाहतूकप्रकरणी दोन ट्रकवर कारवाई
RELATED ARTICLES