Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीत्रिपुटीचे एसटी पिकअप शेड असून अडचण नसून खोळंबा

त्रिपुटीचे एसटी पिकअप शेड असून अडचण नसून खोळंबा

साताराः ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’हे एसटी महामंडळाचे ब्रिदवाक्य आहे. या ब्रिदवाक्याप्रमाणे एसटी बसमधील कर्मचारी, अधिकारी की प्रवासी ग्राहक आपले दैवत मानत आला आहे. मात्र कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी येथील एसटी पिकअप शेड पाहिले तर बाराही महिने प्रवाशांना चक्क ऊन, वारा, पाऊस झेलत रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत बसावे लागत आहे.
सातारा-कोरेगाव दरम्यान संगममाहूली, खावली नंतर त्रिपुटी हा एसटी पिकअप शेड येत असतो. त्रिपुटी येथील पिकअप शेडची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या पिकअप शेडच्या परिसरात गवत, काटेरी झाडे, वेली यांची रेलचेल झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा वावर या रोडवर पहायला मिळत आहे. शाळेचे विद्यार्थी, महिला वर्ग, वृध्द नागरिक यांची पिकअप शेडच्या दुरावस्थेमुळे कुचंबना होत आहे. गोपालनाथ महाराजाचे तीर्थक्षेत्र त्रिपुटी येथे असल्याने असंख्य भक्त गोपालनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र पिकअप शेडच्या दुरावस्थेमुळे भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सातारा विभाग नियंत्रक कोरेगाव आगार प्रमुख तसेच कोरेगाव विधानसभेचे आ.शशिकांत शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून त्रिपुटीचे एसटी पिकअप शेडची रंगरंगोटी व स्वच्छता करून अद्यावत करावे अशी मागणी भाविक भक्त, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थामधून होवू लागली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular