मायणी:- येथील मिरज भिगवण या राज्य महामार्गावरील सांगली -सातारा जिल्ह्यांच्या हद्दीवरील मायणी – माहुली या गावच्या हद्दीवर असणाऱ्या रस्त्यावर पडलेला एक ते दीडफूट खोल असणारा भलामोठा खड्डा भीषण अपघातास निमंत्रण देत आहे .
या मिरज भिगवण या उत्तर दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा राज्य महामार्गाला गतवर्षी नियोजित राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळलीअसून . या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक,बस वाहतूक, हजारो चार चाकी व दुचाकी वाहने मिळून लाखो प्रवाशी मार्गक्रमण करीत असतात. पावसाळ्यात येथे पडलेल्या छोट्या खड्ड्याची मुरुमीकरण करून संबंधित विभागाने तात्पुरती डागडुजी केली होती . परंतु त्यानंतर झालेल्या पावसाने व सातत्याने होणारी वाहतूक यामुळे सध्या या खड्याचा संपूर्ण रस्ताच व्यापल्याने सध्या खड्डा चुकवताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. यामुळे येथे मृत्यू वाट पाहतोय असच म्हणावं लागेल.
परंतु, पावसाच्या पाण्याने हा खड्डा भरला तर येणाऱ्या गाडी ड्राईव्हर ला खड्याचा अंदाज न आल्याने कित्येक वाहने ,दुचाक्या याठिकाणी आदळून कोणी गंभीर जखमी तर कोणच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यामुळे तातडीने या खड्ड्याची डांबरीकरण करून दुरुस्ती करावी.अशी मागणी प्रवाशी करताहेत.
मिरज – भिगवण या राज्यमार्गावरून आम्ही दररोज वाहतूक करीत असतो गेल्या ४ महिण्यापूर्वी छोट्या आकाराच्या या खड्ड्याने आज संपूर्ण रास्ता व्यापला असून त्याची खोली एक ते दीड फूट इतकी आहे. अंदाज न आल्याने कित्येक वाहने याठिकाणी आदळून त्यांचे नुकसान झाले आहे. – शेखर पाटील ,सिव्हिल इंजिनिअर ,प्रवाशी.