सातारा : वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा.सहदेव ऐवळे यांच्या प्रचारार्थ पहिल्या टप्यातींल प्रचार दौरे पूर्ण झाले असून दुसर्या टप्प्यात प्रचार दौरे बुधवार दि.10 पासुन तालुकावार सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होत आहेत.कोपरा सभा व पदयात्रा जिल्हा प्रमुख समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांच्या प्रमुख मार्गदर्शानाखाली संपन्न होणार आहेत.
बुधवार दि.10 रोजी पाटण ,गुरुवार दि.11 रोजी कोरेगाव,शुक्रवार दि.12 रोजी खटाव,शनिवार दि.13 रोजी कराड उत्तर,सोमवार दि.15 रोजी कराड दक्षिण,,मंगळवार दि.16 रोजी जावली,बुधवार दि.17 रोजी वाई, गुरुवार दि.18 रोजी महाबळेश्वर,शुक्रवार दि.19 रोजी खंडाळा,शनिवार दि.20 रोजी सातारा व रविवार दि.21 रोजी सातारा(शहर)असे नियोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी मो.नं.9075956169 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
वंचित बहुजन आघाडीचा दुसर्या टप्प्यातील प्रचार सुरू
RELATED ARTICLES