Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमेढा बाजारपेठ ते चांदणी चौक गटार बांधकामाची माहिती मिळेपर्यंत काम बंद करा,सामाजिक...

मेढा बाजारपेठ ते चांदणी चौक गटार बांधकामाची माहिती मिळेपर्यंत काम बंद करा,सामाजिक कार्यकर्ते संजय शेटे यांची नगरपंचायतीकडे मागणी

मेढा ः मेढा बाजारपेठ ते चांदणी चौक पर्यत बांधण्यात येणारे गटार बांधकामाची योग्य ती माहिती मिळावी, जो पर्यंत योग्य ती माहिती मिळणार नाही तोपर्यंत हे बांधकाम बंद करावे अशा आशयाची मागणी करणारे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजय शेटे यांनी मेढा नगरपंचायतीकडे केले आहे.
मेढा नगरपंचायतीने मेढा बाजारपेठ ते चांदणी चौक या दरम्यान असणार्‍या रस्त्याकडच्या गटारांचे काम सुरू केले आहे.परंतु ते कशा पद्धतीने चालू केले आहे याचे गौडबंगाल मात्र उपस्थित झाले आहे. गटारांची लांबी,रूदी किती आहे, कशा पध्दतीने हे बांधकाम करण्यात येणार आहे, ते नक्की कशा प्रकारे मंजुर करण्यात आले आहे, रस्त्यावर अतिक्रमण असून नक्की कोणाला खुश ठेवण्याचे प्रयत्न नगरपंचायत करत आहे हे बाहेर येणे गरजेचे असून सदर अतिक्रमण झालेली जागेची नगरपंचायत मार्फत योग्य ती मोजणी करण्यात यावी आणि सदरचा होणारा खर्च अतिक्रमण करणारे खातेदार यांच्या घरपट्टीवर टाकण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. मेढा नगरपंचायतीने गटार बांधकामास सुरवात केली खरी परंतु नक्की ते कशा प्रकारे बांधण्यात येणार हे गुलदस्त्यात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना गटार बांधकाम करणार की कोणाच्या दबावाखाली गटाराची लांबी,रुदी बदलणार, या बाबत मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काय भुमिका घेणार , रस्त्यावर झालेले अतिक्रमण, गटारे बांधण्यात दिलेले कंत्राटदार व त्याबाबतची योग्य ती माहिती जनते पुढे येणार का ? याची खमंग चर्चा सर्वत्र सुरु आहे

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular