Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीस्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सातारा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे 92 व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.
दौलतनगर ता.पाटण याठिकाणी स्व.शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन याठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 92 व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रारंभी तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार शंभूराज देसाई यांनी विन्रम अभिवादन केले.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,आपल्या उद्योग समुहाचे श्रध्दास्थान महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे ऋणानुबंध महाराष्ट्राला परिचीत आहेत.शिवसेना पक्षाच्या उभारणीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यातून केले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता स्व.बाळासाहेब ठाकरे हे कारखाना कार्यस्थळावर आले होते
याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, संचालक पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,राजेंद्र गुरव,राजाराम मोहिते,पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक गणीभाई चाफेरकर, जंगम, शफीभाई सातारकर, जे.ए.पाटील,अमोल मोहिते मरळीचे सरपंच राजेंद्र माळी व इतर मान्यवर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच,जय मल्हार संघटना पाटण तालुका यांचे सर्व पदाधिकारी, कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामगार सेवा सोसायटी तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते,शिवसैनिक याप्रसंगी मोठया संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 92 जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ शिवसेना पक्षाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे हस्ते करण्यात आला संपुर्ण पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनिर्वाचीत शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular