सातारा : शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहर शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. सोमवार पेठ, भगवा चौक येथे सातारा शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व शिवसेना प्रमुखाच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी 11 वा. पोवई नाका येथील छत्रपती शवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. सकाळी 11.30 वा. शाहू स्टेडियम समोरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन. दुपारी 12 वा. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान, दुपारी 12.15 वा. आर्यांग्ल हॉस्पीटल येथील रुग्णांना अन्नदान. दुपारी 2 वा. गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना गणवेश व वह्या वाटप. सायं. 7.30 वा. सौ. लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृह यादोगोपाळ पेठ येथील मुलींना चष्मे वाटप व फळवाटप इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व सातारा शहरातील सर्व आजी माजी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, शहरप्रमुख निमिष शहा यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES

