Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीबाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदू धर्मीयांचे रक्षण करतील :- सुरेश पाटील

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदू धर्मीयांचे रक्षण करतील :- सुरेश पाटील

पाटण :- हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेचे नेते नव्हते तर ते समस्त हिंदूस्थानातील हिंदूधर्मीय जनतेचे ह्रदय सम्राट होते. त्यांच्या विचारानेच देशातील अर्थिक क्रांती असलेल्या मुंबई सारख्या शहरात हिंदूधर्मीय मराठ्यांचे अस्तित्व ठिकुण राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच हिंदू धर्मीयांचे रक्षण करतील. धडाडीचे व धाडसी नेत्रुत्व म्हणून त्यांची संपुर्ण देशात ओळख होती. असे गौरवउद्गार पाटण तालुका शिवसेना प्रमुख सुरेश पाटील यांनी त्यांच्या निवास स्थानी झालेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्म्रुतीदिना प्रसंगी काढले. या प्रसंगी या थोर नेत्रुत्वास स्म्रुर्तीदिनानिमीत्त हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन पाटण तालुका शिवसेनेच्या वतिने अभिवादन करण्यात आले.

यावेळी सातारा उपजिल्हा प्रमुख रवींद्र पाटील, कोयना विभाग प्रमुख लक्ष्मण कदम जयवंत कदम , राजेंद्र पाटणकर, अशोक पाटील, रवींद्र जाधव, दादासो सुर्वे आदि शिवसैनिकांची उपस्तिथी होती.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले पाटण तालुक्यात हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला मानणारे कट्टर शिवसैनिक मौजकेच असले तरी ते शिवसेनेशी कट्टरच आहेत. हे शिवसैनिक केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी शिवसैनिक नाहीत. या शिवसैनिकांना राजकीय पद असले काय आणि नसले काय ते हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांचे विचार घेऊनच चालणार असे त्यांनी शेवटी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular