Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीलोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा दुसरा हप्ता रुपये 403/- प्र.मे.टन प्रमाणे बँकेत जमा

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा दुसरा हप्ता रुपये 403/- प्र.मे.टन प्रमाणे बँकेत जमा

दौलतनगर : दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 या गळीत हंगामामध्ये कारखान्यांस ऊस पुरविलेल्या शेतकरी,सभासद,ऊस पुरवठादारांच्या हिताचा विचार करुन रु. 403/- प्र.मे.टनाप्रमाणे ऊसाचा दुसरा हप्ता सोमवार दि. 13-05-2019 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे. सदरची रक्कम रुपये 7 कोटी 91 लाख 15 हजार असून संबंधित सभासद व ऊस पुरवठादारांनी बँकेशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक् संचालक उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या सन 2018-19 या गळीत हंगामामध्ये 1 लाख 96 हजार 315 मे.टन ऊसाचे सरासरी 11.78 टक्के साखर उतार्‍याने 2 लाख 30 हजार 575 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.सन 2018-19 मधील कारखान्याची निव्वळ देय एफ.आर.पी.रुपये 2722/- प्र.मे.टन असून कारखान्याने यापुर्वी रुपये 2180/- प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिले अदा केली असून आज रोजी एफ.आर.पी.देय रक्कमेपोटी रुपये 403/- प्र.मे.टनाप्रमाणे ऊसाचा दुसरा हप्ता ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यामध्ये जमा केला आहे तसेच यंदाच्या हंगामामध्ये देशामध्ये अपेक्षेपेक्षाही जास्त साखरेचे उत्पादन झाले आहे. सहाजिकच त्यामुळे बाजारपेठेतील साखरेचे भाव कोसळले आहेत. यामुळे संपूर्ण साखर उद्योग मोठया अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत कारखान्याने केंद्र शासनाच्या मध्यम कर्ज (सॉफ्ट लोन) 2019 कर्ज योजनेअंतर्गत एफ.आर.पी.पोटी दुसरा हप्ता अदा केला आहे असे स्पष्ट करीत सन 2019-20 या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व सभासद यांनी आपल्या ऊसाची नोंद कारखान्याकडे करुन सर्व ऊस गळीतास कारखान्याला पाठवावा,असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular