Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीम्हासुर्णे येथे बालबाजाराला प्राप्त झाले आठवडी बाजाराचे स्वरुप

म्हासुर्णे येथे बालबाजाराला प्राप्त झाले आठवडी बाजाराचे स्वरुप

म्हासुर्णे (तुषार माने) : म्हासुर्णे ता.खटाव येथील प्राथमिक शाळेच्या आवारात चिमुरड्यांनी बाजार भरवला होता.छोट्यांच्या बाजारात ग्रामस्थ आणि पालकांनी खरेदी करुन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भाजी घ्या भाजी ,ताजी ताजी भाजी सुमधुर कोवळ्या आवाजातील याआरोंळ्यांनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा बाजार गजबजला होता.मुलांच्या आरोळ्यांना प्रतिसाद देत परिसरातील नागरिक व पालकांनीही बालचिमु कडुन भाजी खरेदी करण्यास गर्दी केली होती.मुलांना व्यवहार ज्ञान देण्याच्या उद्देशाने शाळा स्तरावर बालबाजाराचे नियोजन करण्यात येत असुन उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत पालकातुन व्यक्त हौत आहे. या बालबाजारात पहिली पासुन सर्वच मुलांनी सहभाग घेतल्याने या बाजाराला आठवडी बाजाराचे स्वरुप आले होते.
म्हासुर्णे ता.खटाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेत नुकताच बालबाजार भरवण्यात आला होता.या बालबाजार उपक्रमाचे उद्धाटन शाळा व्यवस्थापन कमेठी अध्यक्ष सिकंदर मुल्ला यांच्या हस्ते व ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, संगिता गुरव, सोसायटी चेअरमन दादासो कदम मुख्याध्यापक प्रतापराव पाटोळे, शिक्षक लालसिंग गवळी, भारती माने,जावेद कुरणे, चंद्कांत निकम, मनिषा निकम, कबीर खरमाटे, कमेठी संचालक विश्वास माने, संदिप माने,सुहास माने यांच्या उपस्थित झाले.लहान वयातच मुलांना छोट्या मोठ्या व्यसायाची गोडी निर्माण व्हावी याचबरोबर गणित विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे.तसेच भविष्यात कोणत्याही लहान मोठ्या व्यवसाया बद्दल आपुलकी निर्माण व्हावी या हेतुने हा बाजार आयोजित करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
बालबाजारात कांदे बटाटा. टॉमँटो, कारली, दोडके, वांगी, मेथी भाजी, मिरची, लसुन, शेवग्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, भुईमुग शेगा, इ. भाजीपाल्यासह कडधान्ये व वेगवेगळ्या प्रकारचे खवंय्या स्टाँल देखील लावले होते.इडली,सामोसा, गुलाबजाम, भावभाजी, वडापाव, भेळ, बिस्कीट, तसेच किराणा सर्व साहित्य अशा प्रकारचे खाण्याचे पदार्थ देखील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
म्हासुर्णे जिल्हा प्राथमिक शाळेत अनोखा उपक्रम राबवला याबद्दल क्राती क्रिडा गणेश मंडळाच्या वतिने शाळा व्यवस्थापन कमेठी अध्यक्ष सिकंदर मुल्ला ,मुख्याध्यापक प्रतापराव पाठोळे,लालसिंग गवळी, भारती माने, जावेद कुरणे, चंद्रकांत निकम, मनिषा निकम, कबीर खरमाटे, जरग, मंगल माने, ईनामदार या शिक्षणाचा सत्कार मंडळाच्यावतिने करण्यात आला व शाळेसाठी सात हजार रुपयांची मदत याठीकाणी जाहिर केली.
यावेळी श्रीराम विद्यालयातील सर्व शिक्षक श्री.राठोड सर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक सौ.वदंना माने मँडम, म्हमाणे मँडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी मंडळाचे सर्वेसर्वा सुनिल शहा, गोरख भोसले, स्वप्निल माने, पोलिस पाटील संभाजी माने, विश्वास भोसले, विजय भोसले, संभाजी निकम, संदिप माने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular