वाई: शैक्षणिक क्षेत्रातील काम भविष्याची तरतूद असते.जनता सहाय्यक मंडळ,बावधन गावच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान दिले असून विजयसिंह पिसाळ युवा मंच प्रोत्साहन पाठबळातुन बावधनचा शैक्षणिक दर्जा शिखरावर पोहचवतील असा विश्वास माजी उपसभापती मदन भोसले यांनी व्यक्त केला.
विजयसिंह पिसाळ युवा मंच यांच्या वतीने बावधन येथील गुणवंत विद्यार्थी, आर्मी मध्ये भरती झालेले तरुण आणि कुस्तीगीर यांच्या संयुक्त सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून मदन भोसले बोलत होते.यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ,शशीकांत पिसाळ,राजेंद्र कदम,अंकुश कुंभार,देवस्थानचे अध्यक्ष अजित पिसाळ,पंचायत समिती सदस्य- दीपक ननावरे,सरपंच पप्पूराजे भोसले,निखिल सोनावणे,उपसरपंच तानाजी कचरे,सतेश कांबळे,विश्वास पिसाळ,अमोल जाधव, शिवाजी भोसले,पांडुरंग पिसाळ,दिलीप मांढरे,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भोसले पुढे म्हणाले,विजयसिंह पिसाळ गेल्या 4-5 वर्षात सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात काम करीत आहेत.या कामातून अॅड. पिसाळ यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.या उपक्रमातून बावधनचा शैक्षणिक नावलौकिक वाढता रहो अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.
ऍड विजयसिंह पिसाळ म्हणाले,60-65वर्षे सातत्याने गावातील गुणवंतांच्या पाठीवर थाप टाकण्याची परंपरा पुढे नेण्याची संधी युवा मंच ला मिळाली आहे.ही परंपरा आम्ही अखंडितपणे सुरू ठेवणार आहोत.बावधन परिसरात प्रचंड गुणवत्ता आहे, प्रचंड कौशल्य आहे.आपल्या ग्रामस्थांनी विविध क्षेत्रात काम करून गावचा नावलौकिक वाढवला आहे.या गुणवत्तेची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची व्यापक भूमिका यापुढे युवा मंच घेणार आहे.
यावेळी पप्पूराजे भोसले यांनी विजयसिंह पिसाळ युवा मंचच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी बावधन परिसरातील शालेय गुणवत्ताधारक विद्यार्थी,कुस्तीगीर,सैन्यदलात भरती झालेल्या तरुणांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला.
स्वागत प्रमोद पिसाळ,आंनदा पिसाळ,प्रशांत पिसाळ यांनी केले,सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले तर आभार तानाजी कचरे यांनी मानले.यावेळी बावधन परिसरातील मराठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रतिनिधी शिक्षक विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
बावधनचा युवा मंच प्रोत्साहन पाठबळातुन बावधनचा शैक्षणिक दर्जा शिखरावर पोहचवतील : मदन भोसले
RELATED ARTICLES