Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीबेकायदा उत्खनन व वाहतूक प्रकरणी 31 लाखाचा दंड

बेकायदा उत्खनन व वाहतूक प्रकरणी 31 लाखाचा दंड

फलटण : 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक करणेकामी रॉयल्टी भरुन 574 ब्रास मुरुमाचे अनाधिकृतपणे उत्खनन व वाहतूक परवाना न घेता वाहतूक केले प्रकरणी तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला असून सदरची रक्कम आदेशाचे तारखेपासून सात दिवसात शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा न केल्यास करणेत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 172 मधील तरतुदीनुसार सदर रकमेच्या वसुलीचा आदेश बजावला आहे.
गावकामगार तलाठी कसबै फलटण ता. फलटण यांनी दि. 20 ऑक्टोबर रोजी पंचनान्यान्वये फलटण येथील जुनी स्टेट बैंक कॉलनी येथील विजयकुमार मोतीलाल कोठारी यांच्या मालकीचे प्लॉट मधील बांधकामाचे ठिकाणी 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतूक कोणत्याही प्रकारचा उत्खनन व वाहतूक परवाना न घेता अथवा शासनास रॉयल्टी न भरता केले असलेचे बाब पंचनामा करून तहसीलदार विजय पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती याबाबत फलटण तहसील कार्यालयाकडून जागा मालक यांना याबाबत नोटिस काढणेत आलेली होती. सदर नोटीसमध्ये नमूद केलेनुसार नोटीस मिळालेपासून तत्काळ कागदोपत्री पुराव्यासह लेखी खुलासा सादर करणेबाबत जागा मालक यांना कळविणेत आले होते . त्यावर जागा मालक यांनी दि. 29 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयाकडे लेखी खुलासा सादर केला होता. केवळ 76 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक करणेकामी रॉयल्टी भरुन परवाना घेतलेला असताना सदर ठिकाणी 700 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक केले असलेचे पंचनाम्यात स्पष्ट झाले होते त्यामुळे रॉयल्टी भरलेला 76 ब्रास व जागेवर शिल्लक असलेला 50 ब्रास असा एकूण 126 ब्रास मुरुम एकूण उत्खनन 700 ब्रास मधून वजा करता 574 ब्रास मुरुमाचे उत्खनन व वाहतुक अनाधिकृतपणे केलेचे निदर्शनास आल्याने तहसीलदार विजय पाटील यांनी 30 लाख 99 हजार रकमेचा दंड बजावला असून सदरची रक्कम आदेशाचे तारखेपासून सात दिवसात शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा न केल्यास करणेत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 172 मधील तरतुदीनुसार सदर रकमेच्या वसुलीची आदेश बजावला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular