Friday, April 25, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्‍वर हॉटेल असो. कडून बेल एअर संस्थेला आर्थिक मदत

महाबळेश्‍वर हॉटेल असो. कडून बेल एअर संस्थेला आर्थिक मदत

महाबळेश्‍वर : तालुक्यातील रूग्णासह पर्यटकांना उत्तम वैदयकिय सेवा मिळावी या साठी रेड क्रॉस या संस्थेच्या बेल ऐअर कडुन जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहे परंतु या प्रयत्नांना अर्थिक संकटाचा समाना करावा लागत आहे या संकटातुन बाहेर काढण्यासाठी येथील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी सभासद यांनी बेल ऐअर ला आर्थिक मदतीचा हात दिला असुन त्यांनी नुकताच सव्वा पाच लाख रूपयांचा निधी बेल ऐअरचे फादर टॉमी यांच्या कडे सुपूदर्र् केला या वेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी व सदस्य हजर होतेे.
येथील ग्रामिण रूग्णालयात वैदयकिय सेवेचा बोजवारा उडाला होता अनेक मंत्री येथे भेट देवुन गेले परंतु येथील कारभारात काहीच फरक पडला नाही म्हणुन हे रूग्णालय खाजगी संस्थेकडे हस्तांतर करण्याची मागणी जोर धरू लागली होती ना एकनाथ शिंदे यांनी या विभागाचा अतिरीक्त कार्यभार स्विकारल्या नंतर हस्तांतराच्या निर्णयावर शिक्का मोर्तब केले शासनाच्या निर्णया नंतर 1 फेब्रुवारी 2019 रोजी या ग्रामिण रूग्णालयाचे बेल ऐअर कडे हस्तांतर करण्यात आले रूग्णालय ताब्यात घेतल्या नंतर बेल ऐअर या संस्थेने येथे एक सर्जन व चार एम बी बी एस असे एकुन पाच डॉक्टर आणि 18 नर्स यांची नेमणुक करून रूग्णांची सेवा सुरू केली पाहता पाहता हे रूग्णालय गजबजु लागले पुर्वी येथे ओपीडी मध्ये रोज 30 ते 40 रूग्ण येत आता हीचसंख्या 150 च्या वर गेली आहे मंगळवारी हीच संख्या 250 पर्यंत जाते पुर्वी येथे रूग्ण दाखल करून घेतले जात नव्हते परंतु आज आकरा रूग्ण दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहीती फादर टॉमी यांनी दिली येथे दर मंगळवारी व शुक्रवारी सायंकाळी हस्तीरोग तज्ञ डॉक्टर आषिश सावरकर तसेच दर मंगळवारी बालरोग तज्ञ डॉ गौरी शहा येथे भेट देवुन रूग्णांना सेवा देत आहेत या मध्ये वाढ करून रोज वेगवेगळे तज्ञ डॉक्टर येथे भेट देणार असुन त्यांचे वेळा पत्रक तयार करण्यात येत आहे प्रसुतीगृहा बरोबरच ऑपरेशन थिएटर सज्ज करण्यात आले आहे पुर्वीचे एक्स रे मशिन बंद पडले होत आता त्या जागी दसरे मशिन बसविण्यात आले आहे रूग्णालसा साठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधांस पुढील दोन महीन्यात हे ग्रामिण रूग्णालय सज्ज असेल असा विश्‍वास या वेळी फादर टॉमी यांनी व्यक्त केला.
अनेक दानशुर व्यक्तीनी विविध प्रकारची उपकरणे रूग्णालया भेट दिली आहेत रूग्णालय इमारत व फर्निचर यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे ते काम हाती घेण्यात आले आहे परंतु या कामासाठी आचार संहीते मुळे अडचणी येत आहेत ही मोठी समस्या उभी राहीली आहे या समस्या सोडविण्याचा एक प्रयत्न म्हणुन हॉटेल संघटनेने आर्थिक मदत देण्यासाठी हात पुढे केला असुन त्यांनी काल सव्वा पाच लाख रूपयांचा धनादेश बेल ऐअर चे फादर टॉमी यांच्याकडे सुपूर्द केला या वेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष कैलेश तेजाणी , रमेश कौल , रिचर्ड मॅन्युवल , गौरव चंदन , किशोर मखिजा , प्रदिप जवेरी , हरप्रित महाबळेश्‍वरवाला , सपना आरोरा , फरीद काजी आदी मान्यवर उपस्थित होते
हॉटेल संघटनेने मानवतेचे दर्शन घडवुन आर्थिम मदतीचा हात दिल्या बद्द्ल फादर टॉमी यांनी हॉटेल संघटनेचे आभार मानले आहेत तसेच तुमच्या या मदती मुळे रूग्ण सेवा अधिक उत्तम रित्या करण्यासाठी पाठबळ मिळणार आहे असेही फादर टॉमी म्हणाले भविष्य काळात डिजीटल एक्स रे मशिन आणि जनरेटरची रूग्णालयास आवश्यक्ता असुन दानशुर व्यक्तीनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही या वेळी त्यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular