कोरेगांव ः कोरेगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर 128 वी जयंती कोरेगांव शहर विकास मंचचे वतीने साजरी करण्यात आली. यावेळी समाजहित सर्वतोपरी जपणारे सामाजीक कार्यकर्ते तसेच कोरेगांव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे विध्यमान संचालक किशोर बर्गे, यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून व फुले वाहून विनम्र अभिवादन करणेत आले.
किशोर बर्गे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज आपण कोरेगांव शहर विकास मंचचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करीत आहोत. समानतेचे युग यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर फार परिश्रम घेतले. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांनी दिलेल्या शिकवणीतूनच नवीन शोषणमुक्त समाज घडू शकतो.कार्यक्रमास कार्याध्यक्ष दिलीपराव बर्गे, संभाजी जाधव, निलेश बोतालजी, अतुल येवले, सुरेश मदने व कोरेगांव विकास मंचचे सामाजीक कार्यकर्ते उपस्थित होते.
आधुनिक भारताचे संविधान समाजातील सर्वांना समान न्याय देणारे : किशोर बर्गे
RELATED ARTICLES