Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीशाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे प्राण वाचवले.
अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला शाहूगनर येथील रेणूकामाता मंदीर परिसरात घुले बंधू राहण्यास आहेत. सकाळी सहाच्या सुमारास कोणत्यातरी प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज येवू लागल्याने संतोष आणि प्रकाश घुले हे दोघे घराच्या पाठीमागे आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एक भेकर भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्याचे त्यांना दिसले. दोघांनीही क्षणाचा विलंब न करता कुत्र्यांना हुसकावून लावले आणि भेकराची सुटका केली. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात भेकर गंभीर जखमी झाले होते. त्याला पाणी पाजल्यानंतर संतोष घुले यांनी सातारा वन विभागाचे सुहास भोसले यांना फोन करुन जखमी भेकराबाबत माहिती दिली.
काही वेळानंतर सुहास भोसले घुले यांच्याकडे आले आणि त्यांनी भेकर ताब्यात घेतले. यानंतर त्या भेकराला वनविभागाच्या कार्यलयात नेवून उपचार सुरु करण्यात आले.
जखमा गंभीर असल्याने दोन- तीन दिवस उपचारानंतर भेकराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येईल, असे भोसले यांनी सांगतिले आणि भेकराचे प्राण वाचवल्याबद्दल त्यांनी व इतर नागरिकांनी घुले बंधुंचे अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular