मायणी:- (सतीश डोंगरे) मायणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीची सुरुवात करण्यात आली.
समस्त धनगर समाज्याच्या वतीने सायंकाळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली .यावेळी श्री धनगर विठोबा गजी मांडला कडून गजीनृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता .यावेळी गजीनृत्य मंडळांनी चांदणी चौक मायणी येथे गजीनृत्याचा बहारदार कार्यक्रम करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आखिल धनगर समाजातील मुलांसाठी शिक्षणाचा पाया रचला मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला. समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे,
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या विचारांची जोपासना करण्यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान कचरेवाडी (मायणी) यांच्या वतीने जयंती सोहळ्याचे आयोजन केले जाते ,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पडळकर यांनी दिली.