Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीश्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस थाटात ; ७४ व्या वाढदिवसानिमित्त...

श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस थाटात ; ७४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

पाटण- (प्रतिनिधी) पाटण तालुक्याचे भाग्य विधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांचा ७४ वा वाढदिवस पाटण व चाफळ येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यावेळी विक्रमसिंह पाटणकर यांना दुरध्वनी वरून संपर्क साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, यांनी शुभेच्छा दिल्या तर चाफळ येथील गौरव कार्यक्रमात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईकनिंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार,आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रराजे शिंदे, आ. नरेंद्र पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजिवराजे नाईकनिंबाळकर, वनिताताई गोरे, मनोज पवार, उज्वला जाधव, राजाभाऊ शेलार, सोपानराव चव्हाण, राजाभाऊ काळे, यांनी शुभेच्छा दिल्या तर पाटण येथे दैनिक ग्रामोध्दारच्या वतिने संपादक एकनाथ थोरात, पाटण प्रतिनीधी शंकर मोहिते, पत्रकार सागर पाटील, यांनी अंक देऊन शुभेच्छा दिल्या.

पाटण येथील शिक्का मेन्शन या निवास स्थानी सकाळी श्रीराम मंदिरात कुलदैवत श्री पदमावतीदेवी, श्रीरामाचे दर्शन झाल्यावर विक्रमसिंह पाटणकर यांनी शुभेच्छा स्विकारण्यास सुरुवात केली. यावेळी पाटण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दिपकराव शिंदे, नगरसेवक किरण पवार, उमेश टोळे, अजय कवडे, सचिन कुंभार, प.स. सदस्य बबनराव कांबळे, विलासराव देशमुख, उज्वला लोहार, प्रतापराव देसाई, रूपाली पवार, रेश्मा जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा उपाध्यक्ष महेश कांबळे, कवी यशवंत प्रतिष्ठानचे शिरीष पवार, संभाजीराव देशमुख, शिरीष पेंढारकर, प्रविण यादव, समाज सेवा संघाचे अध्यक्ष गणेश मोरे, मंगेश पाटणकर, बकाजीराव निकम, चंद्रकांत मोरे, आदी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

श्रीमंत सरदार विक्रमसिंह पाटणकर यांना पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतिने अध्यक्ष शंकर मोहिते, सचिव भगवंत लोहार, कार्याध्यक्ष बाबासो सुतार महिला प्रतिनीधी विद्या म्हासुर्णेकर- नारकर, पाटण प्रमुख नितीन खैरमोडे, विक्रांत कांबळे, प्रशांत बेंद्रे,संजय कांबळे, सागर पाटील आदी पत्रकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular