सातारा : पोलीस दलाने शहिदांनी बलिदान दिले, आपण रक्तदान करू अशी साद सातारकरांना घालत अलंकार हॉल येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला प्रतिसाद देत 406 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रां. नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयाच्या रक्तपेढीचे कर्मचारी दिवसभर या उपक्रमात सहभागी होते. डीवायएसपी. गजानन राजमाने, पोनि. प्रमोद जाधव, पोनि. किशोर धुमाळ आणि पोलीस कर्मचार्यांनी परिश्रम घेतल्याने दिवसभर रक्तदात्यांची मोठया संख्याने रेलचेल होती.
सकाळी 9 वा. डीवायएसपी. गजानन राजमाने यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. 15 खाटा आणि सिव्हील हॉस्पिटलच्या 18 अधिकारी-कर्मचारी यांच्या सहाय्याने रक्तदानाचा कार्यक्रम संध्यकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होता. खाकीच्या हाकेला प्रतिसाद दिल्याने 406 रक्ताच्या बाटल्या एका दिवसात जमा झाल्या. याकरिता पोलीस दलातील बहुतांश अधिकारी-कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि सातारकर नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शहर, तालुका आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यांसह जिल्हा पोलीस दलातील बहुतांश कर्मचारी शिबिरात सहभागी झाले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी शिबिराला भेट देत नेटक्या नियोजनाचे कौतुक केले.
पोलिसांच्या मेगा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES