Thursday, April 24, 2025
Homeठळक घडामोडीसाताऱ्यातील बोगदा करतोय पावसाळ्यात ठिबक सिंचन, दुरुस्तीची मागणी

साताऱ्यातील बोगदा करतोय पावसाळ्यात ठिबक सिंचन, दुरुस्तीची मागणी

(अजित जगताप)
सातारा दि: सातारा शहराच्या प्रवेशद्वारा नजिक एकमेव बोगदा असलेल्या जागेतून सध्या पावसाळ्यात पाणी म्हणजे ठिबक सिंचना बाबत चांगलीच चर्चा होऊ लागलेली आहे. याबाबत तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व वाहन चालक करत आहेत.
याबाबत माहिती अशी की ,पूर्वी सातारा शहरा मध्ये येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग होता. या ठिकाणी अजूनही जुना मोटर स्टँडच्या खुणा व आठवणी निघत आहेत. सातारा शहरात येण्यासाठी केंद्रे मार्गी सातारा येथे ब्रिटिश कालीन बोगदा आहे. या बोगद्यामधून सध्या दोन्ही बाजूने पाणी टिपकत असून अनेकांना या शॉवरचा अनुभव घेऊनच दुचाकी वाहन पुढे घेऊन जावे लागत आहे. या बोगद्याबाबतची अधिकृत माहितीचा फलक असून या फलकावरील कोरीव अक्षरांमध्ये सध्या रंग उडल्यामुळे याबाबतचा तपशील मिळू शकलेला नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्ग बोगदा ते शेंद्रे जुना पुणे बेगलोर हायवे असे त्याचे नामकरण झाले असून या रस्त्यावरून भटक्या विमुक्त जाती संशोधन संस्थेचे महाविद्यालय आहे या ठिकाणी जगभरचे लोक भेट देत असतात.याच रस्त्यावरून ४ किलोमीटरवर अजिंक्यतारा किल्ला, २१ किलोमीटर कास पुष्प पठार, १२ किलोमीटर सज्जनगड २२ किलोमीटर ठोसेघर धबधबा व १३ किलोमीटर उरमोडी धरण आहे.
सातारा जिल्हा पर्यटन समितीने याबाबत रस्त्यावर फलक लावण्यात आलेले आहे. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बामणोली या परिसरात याच रस्त्यावरून जावे लागते. सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सदरच्या बोगद्याबाबत त्यावेळच्या राष्ट्रीय महामार्गाकडे तांत्रिक माहिती उपलब्ध असू शकते. असे सांगण्यात आले. फार पूर्वी नवीन महामार्ग नसताना कोल्हापूरवरून पुढे या ठिकाणी जाण्यासाठी सातारला यावे लागत होते. आणि या बोगदा मार्गी पुढे पुण्याच्या दिशेने जावे लागत होते. अजूनही काही लोक सातारा शहराकडे येताना याच मार्गाचा अवलंब करतात.
सध्या नवीन राष्ट्रीय महामार्ग झाल्यापासून बहुतेक एस.टी. बस व इतर वाहने ही नवीन राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करत आहेत. सध्या या बोगदा परिसरात दोन्ही बाजूला पाणी साचल्यामुळे पायी येणाऱ्या प्रवाशांना रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. वास्तविक पाहता या बोगद्याची देखभाल दुरुस्ती तसेच या बोगद्याबद्दल असणारी माहिती फलक व त्यावरील उडणारा रंग पुन्हा टाकून त्याची माहिती जाणकार व्यक्तीपर्यंत पोहोचवावी. अशी मागणी अनेकांनी केलेली आहे. या बोगद्याच्या रस्त्यावर ओल झाल्यामुळे अनेक वाहन घसरून पडत असल्याची तक्रार वाहन चालकांनी केलेली आहे.
—————————————–

सातारा शहराच्या प्रवेशद्वार नजिक असलेल्या बोगदा (छाया- अजित जगताप, सातारा)

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular