केळघरः वेण्णा लेक धरणातून मेढा, केळघर विभागातील 54 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडण्यात यावे तसेच वेण्णा लेक धरणापासून खाली वेण्णा नदीवर ज्या उपसा जलसिंचन योजना व व शेतकरयांच्या खासगी इलेक्ट्रीक मोटारी चालू आहेत. त्या तातडीने बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधितांना तातडीने द्यावा अशी मागणी बोंडारवाडी धरण कृती समितीने सातारा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात केली आहे.
जिल्हाधिका़र्यांना दे़ण्यात आलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यात बोंडारवाडी येथे धरण व्हावे यासाठी बोंडारवाडी धरण कृती समिती गेल्या पाच ते सहा वषार्ंपासून प्रयत्न करीत आहे.कृती समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि.15-12-2019 च्या पत्राद्वारे बोंडारवाडी धरणासाठी कण्हेर जलाशयातून 5.16 दशलक्ष घन मीटर एवढे पाणी आरक्षित केले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करणे अपेक्षित आहे.यावर्षी मेढा, केळघर विभागातील 54 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.बहुतेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.त्यामुळे या 54 गावांना वेण्णा लेक धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच वेण्णा लेक धरणापासून खाली वेण्णा नदीवर ज्या उपसा जलसिंचन योजना व व शेतकरर्यांच्या खासगी इलेक्ट्रीक मोटारी चालू आहेत. त्या तातडीने बंद करण्याचा आदेश प्रशासनाने द्यावा.बोंडारवाडी धरणाचे काम पूर्ण होईपयर्ंत दरवर्षी् एप्रिल ते ते जून या कालावधीत दर 15 दिवसांनी मेढा, केळघर विभागातील 54 गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे.तसेच फेब्रुवारी महिन्यापासून वेण्णा लेकमधून उपसा जलसिंचन योजना बंद कराव्यात अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी हे निवेदन स्वीकारले.यावेळी बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी,मोहनराव कासुर्डे,प्रा.तुकाराम ओंबळे,व्ही.सी.सुरवे,सुरेश कासुरडे यांच्यासह बोंडारवाडी धरण कृती समितीचे सभासद उपस्थित होते.

                                    