Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीआ.बाळासाहेब पाटील यांचेकडून बोरगांव (टकले) येथील रेल्वे मार्गाची पाहणी

आ.बाळासाहेब पाटील यांचेकडून बोरगांव (टकले) येथील रेल्वे मार्गाची पाहणी

कराड : पुणे ते मिरज या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून, कराड उत्तरमधील बोरगांव (टकले) ता.कोरेगांव येथील सुरू असलेल्या दुहेरी रेल्वे मार्गाची पाहणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली व तेथील शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेेतल्या.
सदर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे बोरगांव (टकले) गावाच्या पश्‍चिम बाजूला नदी पात्र व पुर्वेकडील बाजूस रेल्वे मार्ग असल्याने शेतकर्‍यांच्या शेती मालाची वाहतूक करणे व रहदारी करणे अडचणीचे असून येथील नियोजित दुहेरी रेल्वे मार्गाची व तेथील परिस्थितीची पाहणी आ.बाळासाहेब पाटील यांनी केली व शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 या प्रसंगी गावातील आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular