औंध : छत्रपती शिवाजी महाराजाचे सात मावळे त्यापैकी एक सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बद्दल अकोला येथील वक्ता अमोल मिटकरी यांने आक्षेपार्ह वक्ततव्य केले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे .
याचाच निषेध म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी असलेल्या भोसरेगावातील सरसेनापती अधिष्ठान व ग्राम पंचायत भोसरे आणि सर्व भोसरे ग्रामस्थांनच्यावतीने भोसरेसह चौकीचा आंबा परिसरात निषेध करत आंदोलन करण्यात आले .
यावेळी अमोल मिटकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने मारून पुतळ्याचे दहन करत निषेध करण्यात आला . निषेध करत असताना भोसरेकर ग्रामस्थ म्हणाले की , सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या अमोल मिटकरी याला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र करू .याबाबतचे लेखी निवेदन भोसरे ग्रामस्थांनी औंध पोलीस स्टेशनला दिले आहे.
सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल भोसरे ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन व पुतळा दहन
RELATED ARTICLES