साताराः येथील मंगळवार पेठेतील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सवाचे आयोजनकरण्यात आले आहे. मागील रविवार दि. 23 डिसेंबर पासून येथे हा दहा दिवसांचा पुण्यतिथी महोत्सव सुरु असून येत्या सोमवारी दि. 31 डिसेंबरला या उत्सवाचा मुख्य दिवस आाहे. सोमवारी पहाटे 5 वाजून 55 मिनीटांनी या मंदिरात गुलाल फुले उधळण्याचा कार्यंक़्रम संपन्न होणार आहे अशी माहिती या मंदिराचे विश्वस्त व मठाधिपती अशोकभाऊ पानस्कर गुरुजी यांनी दिली.
या मंदिरात 5 ऑक्टोबर 2002ला ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या अतिशय सुरेख अश्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर येथ अखंड सेवा सुरु असून महाराजांच्या कृपेनेच येथे सामुदायिक असा तेरा कोटी रामनाम जप कार्यंक़्रम आजपयर्र्त 3 वेळा संपन्न झाला आहे.
येत्या सोमवारी सकाळी पुण्यतिथी व गुलाल फुले उधळण्याच्या कार्यंक़्रमानंतर दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत महाप्रसाादाचे आयेजन करण्यात आले आहे. तसेच येथे दर पौर्णिमेला मोफत वैद्यकिय शिबीरही आयोजीत केले जाते.
या मंदिराशी संलग्न अशा साई चैतन्य शैक्षणिक व वैद्यकिय सेवा संस्थेतर्फे नियोजीत उपक्रमात हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून गरजूंच्या कल्याणासाठी ही संस्था सदैेव सेवा देत आहे. मागील 15 वर्षात या संस्थेने आजपयंर्ंंत अनेक मोफत रोग निदान शिबीरे घेतली होती. महागाईच्या काळात गोरगरीबांनी वैद्यकिय सेवा परवडत नसल्याने संस्थेने ही सेवा आता अल्प दरात देण्याचे ठरविले आहे. यासाठी 20 ते 30 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सुरु कण्याचा मानस असून निधी उभारण्यासाठी सर्व दानशूर,नामवंत उद्योजक व्यक्ति व संस्थांना या साठी ऐच्छिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
ही संस्था 80 जी कलमानुसार प्रमाणित असून त्याचा नंबर झक/उखढ-111ढएउक/80ॠ/164/ 2009/10 असा आहे. या कलमाद्वारे देणगी देणार्यास आयकरातुन कर माफ आहे. तरी साई चैतन्य वैद्यकिय सेवा संस्था सातारा या संस्थेच्या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या सातारा शाखेच्या बँक खाते क्रमांक 345601000466 वर आपली मदत चेक किंवा डी.डी. द्वारे जमा करावी याची रितसर पावती देण्यात येईल असे आवाहन ही यावेळी करण्यात आले आहे.
सगुण रुप मंदिरातील पुण्यतिथी सोहळ्यास सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पानस्कर गुरुजींनी केले आहे.
सोमवारी सगुण रुप ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन,गोरगरिब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी मदतीचे आवाहन
RELATED ARTICLES