सातारा :लोकुत्तरा आंतरराष्ट्रीय भिक्खु प्रशिक्षण केंद्र चौका, अजिंठा रोड औरंगाबाद यांचे कडून चौका-औरंगाबाद लोकुत्तरा महाविहार येथे शनिवार दि.18 रोजी नेत्रदीपक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाउपासक डॉ हर्षदीप कांबळे या सनदी अधिकार्याच्या व त्यांच्या घम्मपत्नी रोजाना यांच्या धम्मदानातून सदरचे केंद्र भिक्खु संघास अर्पण करण्यात आले आहे. लोकुत्तरा महाविहाराच्या परिवेणेत 50 फूट उंचीचे तथागत भगवान बुद्ध यांच्या भव्य रूपाचे लोकार्पण करण्यात येत आहे. हा सोहळा सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी पुज्य भदंत बोधीपालोजी महास्थविर हे मार्गदर्शक तर डॉ. लॉबसांग सांग्वे, राष्ट्राध्यक्ष तिबेट सेंटर एडमिनिस्ट्रेशन धर्मशाला आणि देश-विदेशातील वंदनिय भिक्खू संघाची या कार्यक्रमाला उपस्थिति असणार आहे.
नव्याने उभारण्यात येत असलेले बुद्ध रूप धवल रंगात असून यामुळे महाविहाराच्या व आंतरराष्ट्रीय भिक्खू प्रशिक्षण केन्द्राच्याच नव्हे तर औरंगाबादच्याही वैभवात भर पडणार आहे. रात्रिचे वेळी त्यावर लेसर किरणोत्सव सुरू झाल्यावर नजारा पाहण्या सारखा असणार आहे. सहल म्हणून आपल्याला येथे कधीही जाता येईल,पण भिक्खू संघाने आयोजित केलेला हा सोहळा पाहणे ही एक पर्वणी असणार असून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सुवर्ण संधी मात्र परत येणार नाही म्हणून आपण मित्र-परिवार, नातेवाईक यांना घेवून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन राष्ट्रनिर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर विचार मोहत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
बुद्धपौर्णिमेला दि.18 रोजी 50 फूट उंचीची बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा
RELATED ARTICLES