सातारा :- सातारा शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे आयोजित ”रचना – 2022” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन सैनिक स्कुल ग्राऊंड, सातारा येथे दि. 24, 25, 26 व 27 नोव्हेंबर 2022 यावेळी (सकाळी 10.00 ते रात्री 9.00 पर्यंत) आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश विनामुल्य असेल.
आपल्या स्वप्नातील घर शोधणार्या, तसेच रिअलर्इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिनार्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे 31 वे वर्ष साजरे करत आहे.
सध्या बांधकाम क्षेत्रासाठी नविन नियमावली लागु झाली आहे. त्यामुळे सातारा शहर व परिसर हा पर्यटन द़ृष्टया दिवसेंदिवस महत्वाचा ठरू पाहतोय. शिरवळ खंडाळयापर्यंत आलेले औदयोगिक क्षेत्र पुढील टप्पा म्हणून सातारा शहराकडे या पुढील काळात नक्कीच आकर्षित होणार आहे.
अशा या विकासासाठी वाटचाल करू पाहणार्या आणि निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या सातारा शहरात स्वत:चे घर असणे किंवा भविष्यकाळासाठी शाश्वत गुंतवणूक म्हणून फ्लॅट/प्लॉट/ऑफीसेस् खरेदी करणे ती सुखद भविष्यासाठी नांदी ठरणार आहे.
”रचना – 2022” हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी -विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझार्इन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव नविन तंत्रज्ञान, प्लंबींग, किचन, गार्डन्स साठी लागणार्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्था. ”रचना – 2022” प्रदर्शनाचे प्रायोजकत्व विकास भटेवरा व्हेंचर्स, आयकॉन स्टील व स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी स्वीकारले आहे.
नविन सरकारी धोरणानुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीतकमी व्याज दराने खरेदी दारांना पुरवले जाणार आहे. त्याच प्रमाणे आत्तापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहेत. रचना 2022 या वास्तूप्रदर्शनात अनेक बांधकाम व्यावसायिक अनेक आकर्षक योजनांसह सहभाग घेणार आहेत. त्यामुळे घर घ्यायची हीच योग्य वेळ आहे.
या प्रदर्शनात 1२० हून अधिक स्टॉल्स् उभारले जाणार असून बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंटस्, इलेक्ट्रिकल अॅसेसरी, इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरिअलस्, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस, इक्विपमेंटस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल. याशिवाय ”रचना – 2022” बांधकाम विषय प्रदर्शनात फूड स्टॅल्सचीही उपाययोजना करण्यात आली आहे.
”रचना – 2022” हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत. सैनिक स्कुल ग्राऊंडच्या भव्य ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. 4 दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त लोक शहर, जिल्हा व आजुबाजुच्या परिसरातून येऊन या प्रदर्शनास भेट देतील असा आयोजक समितीचा अंदाज असून 80 ते 100 करोडची उलाढाल या प्रदर्शनातून होर्इल असा विश्वास आहे.
ना नफा ना तोटा हेच ध्येय समोर ठेऊन सातारा सेंटरतर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जाते. सर्व सभासद प्रसंगी स्वत:ची कामे बाजुला ठेऊन या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायास ऊर्जीतावस्था येण्यासाठी व खरेदीदारांना आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात.
तुम्हा सर्व पत्रकार मित्रांच्या माध्यमातून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर सर्व लोकांना/ व्यावसायिकांना असे आवाहन करते की, जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.
रचना २०२२ या प्रदर्शनाची माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरचे चेअरमन राजेश देशमुख, सेक्रेटरी ओंकार शिंदे, उपाध्यक्ष आजिनाथ शिराळ यांनी उपस्थितांनी दिली. यावेळी खजिनदार हेमंत दरेकर, कौन्सिल मेंबर सचिन देशमुख, श्रीराज दिक्षीत व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी चेअरमन व सदस्य उपस्थित होते.