सातारा :- पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणार्या रचना 2022 या बांधकाम विषयक भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ढोल ताशांच्या निनादात, शिंग तुतार्यांच्या गजरात व फटाययांच्या आतषबाजीत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसीडेंट मा.श्री निमिष पटेल यांच्या हस्ते आणि साताराचे आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बीएआय चे वेस्ट झोनचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. राजेेंद्र आठवले, महाराष्ट्र स्टेट चेअरमन श्री. दत्तात्रय मुळे, माजी नॅशनल प्रेसिडेंट अविनाश पाटील, माजी राष्ट्रीय व्हाईस प्रसिडेंट रणजित मोरे, माजी स्टेट चेअरमन रणधीर भोईटे, व्ही. बी. व्हेंचर्सचे डायरेयटर श्री. विवेक लोढा, आयकॉन स्टीलचे मॅनेजिंग डायरेयटर श्री. दिनेश राठी, स्टेट बँक ऑफ इंडिया चे बिझनेस ऑफिसर श्री. संजित पाठक, परफेयट हाऊस प्रा. लि. चे डायरेयटर श्री. विपुल घेलाणी, राहुलदेव प्रमोटर्सचे डायरेयटर श्री. श्रीकांत मोहीते, राज्याचे माजी अध्यक्ष व बिल्डर्स असोसिएशनचे चेअरमन राजेश देशमुख, व्हाईस चेअरमन अजिनाथ शिराळ, सेक्रेटरी ओंकार शिंदे, खजिनदार हेमंत दरेकर, कौन्सिल मेंबर श्रीराज दिक्षीत, सचिन देशमुख, सुधीर घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रंगारंग कार्यक्रमात संपन्न झाले.
यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया चे नॅशनल प्रेसिडेंट निमीष पटेल म्हणाले की, स्वत।चे एक घर असावे हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. पुढील काळात सर्व सामान्यांना परवडणारी घरे म्हणजेच अॅफोर्डेबल हाऊसेस या संकल्पनेवर काम करावे. बीएआय चे सातारा सेंटरचे काम नेहमीच कौतुकास्पद असते. सातारा सारख्या छोट्या शहारात रचना सारख्या भव्य वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करून सातारा सेंटरने देशभर नावलौकीक मिळवला आहे. बीएआय सातारा सेंटरची टीम ही देशातील सर्वात तरूण टीम आहे. आजच्या घडीला केवळ शहरांच्या विकासाचा विचार न करता ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुध्दा बिल्डर्स असोसिएशनच्या सदस्यांनी प्रयत्न करावेत असे उद्गार निमीष पटेल यांनी काढले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने आयोजित रचना 2022 या बांधकाम विषयक सर्वकाही असणार्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी निमीष पटेल बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, राजकारणात यायच्याआधी आम्ही बिल्डर क्षेत्रातच होतो त्यामुळे बीएआय सातारा व आमचा ऋणानुबंध पहिल्यापासूनच आहे. सातारा सेंटरच्या वैशिष्ठयपूर्ण उपक्रमांमुळे सातारा सेंटरचे नांव देशभर झालेले आहे याचाच भाग म्हणून आता पुढील काळात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या राज्य पातळीवरील प्रमुख पदाचा मान सातारा सेंटरला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी त्यांनी रचना या प्रदर्शना विषयी गौरवोद्गार काढताना सांगितले की पुणे, मुंबई, बेंगलोर या महानगरांमध्ये होणार्या प्रदर्शनांच्या तोडीस तोड हे प्रदर्शन असून सातारसारख्या मध्यम आकाराच्या शहरात अशा प्रकारचे प्रदर्शन सलग बारावेळा साकारणे ही सोपी गोष्ट नाही. बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे अध्यक्ष राजेश देशमुख म्हणाले की, सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना 2022 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मंडप, आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिसटीम्स्, आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे भव्य दिव्य आयोजन आहे. रचनाच्या यशस्वी आयोजनाचे हे बारावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे चार लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील व सुमारे 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल रचना 2022 मध्ये होईल ही अपेक्षा आहे.
यावेळी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने निमीष पटेल यांचा सन्मानचिन्ह, बुके देऊन असोसिएशनचे अध्यक्ष राजेश देशमुख यांनी तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार सचिन देशमुख यांनी व अन्य मान्यवरांचा सत्कार उपाध्यक्ष अजिनाथ शिराळ, सेक्रेटरी ओंकार शिंदे, खजिनदार हेमंत दरेकर व श्रीराज दिक्षीत यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन साहिल शेख व श्रीराज दिक्षीत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेक्रेटरी ओंकार शिंदे यांनी केले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांनी यांनी रचना प्रदर्शनातील सर्व स्टॉल्स्ची पहाणी करून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास बिल्डर्स असोसिएशनच्या मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, बारामती, इचलकरंजी, फलटण, पंढरपूर व अन्य शहरातील पदाधिकारी, सातारा सेंटरचे सर्व पदाधिकारी, सदस्य व कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रचना 2022 प्रदर्शन हे सैनिक स्कुलच्या भव्य मैदानावर दि. 24 ते 27 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केले असून प्रवेश विनामुल्य आहे. सदर प्रदर्शनास सर्वांनी सहकुटुंब आवर्जून भेट द्यावी असे आवाहन बिल्डर्स असोसिएशनच्या सातारा शाखेतर्फे करण्यात आले आहे.