सातारा : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरने 15 सप्टेंबर हा ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या’ यांचा जन्मदिवस अर्थात ‘इंजिनीअर्स डे’ ‘आनंदाश्रम-ओल्डेज होम’ मधील आज्जी-आजोबांसोबत साजरा केला. यावेळी बीएआयच्या वतीने सात टेलिव्हिजन संच भेट देण्यात आले.
बिल्डर्स असोसिएशन सातारा सेंटर, बीएआयचेच मेम्बर्स असलेला छत्रपती ग्रुप आणि बीएआयचे एक्झीक्युटिव्ह कमिटी मेम्बर श्री. हेमंत कदम यांनी मिळून ही जबाबदारी उचलत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. बिल्डर्स असोसिएशन गेली अनेकवर्ष सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांना मदत करत असते. आजच्या या टेलिव्हिजन प्रदान प्रसंगी बिल्डर्स असो. ऑफ इंडियाचे महाराष्ट्र स्टेट चेअरमन श्री. सचिन देशमुख, बिल्डर्स असो.
सातारा सेंटरचे चेअरमन श्री. अनिल दातीर, व्हाईस चेअरमन श्री. सुधीर ठोके, सेक्रेटरी श्री. कौस्तुभ मोरे, ट्रेझरर श्री. हर्षद वालावलकर, जीसी मेम्बर्स, कमिटी मेम्बर्स, व बीएआयचे सभासद हजर होते. त्याचबरोबर ॠआनंदाश्रमम चे अध्यक्ष डॉ. अरविंद काळे, कार्यवाह सौ. अंजली कुलकर्णी, संचालक अविनाश कुलकर्णी, प्रवीण देशपांडे, विश्वास पराडकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. आनंदाश्रम च्या वतीने डॉ. अंजली कुलकर्णी यांनी बीएआयच्या सर्व सदस्यांचे आभार मानले.
बिल्डर्स असोसिएशन तर्फे आनंदाश्रमास सात टेलिव्हिजन संच भेट
RELATED ARTICLES