सातारा ः आज सरकारी अधिकार्यांकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टीकोन म्हणजे भ्रष्टाचारी, वेळखाऊपणा करणारे असा झाला आहे. काही अंशी हे जरी खरे असले तरी आता सराकारी कामे व अधिकारी यांच्यात बदल झाला आहे. उद्याच्या भारत घडवणार्या पिढीने या सर्व गोष्टी बाजुला ठेवून नेशन बिल्डींग म्हणजेच राष्ट्र उभारणी हे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून सरकारी नोकरीत यावे असे उद्गार वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन यांचे कार्यकारी अभियंता ओंकार शेंदूरे यांनी काढले.
भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा होतो. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन कॉलेज येथे साजर्या करण्यात आलेल्या अभियंता दिनी आयोजित कार्यक्रमात ओंकार शेंदूरे बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता आर. के. जाधव, शाखा अभियंता रविकुमार आंबेकर, कर्मवारी भाऊराव पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य बी. व्ही. कदम, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, सेक्रेटरी नितीन माने, उपाध्यक्ष संतोषकुमार जगताप, खजिनदार रमेश उबाळे, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
योवळी ओंकार शेंदूरे यांना एमपीएससी, गेट, एसएससी, सेट, युपीएससी, जेईई या व इतर स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून दिले. यावेळी अधिक्षक अभियंता आर. के. जाधव यांनी सध्या सातारा शहरात होत असलेल्या सर्वात महत्वाकांक्षी ग्रेड सेपरेटर या प्रकल्पाची सचित्र माहिती उपस्थितांना करून दिली.
यावेळी बिल्डर्स असोसिएशन तर्फे कर्मवीर भाऊराव पाटील तंत्रनिकेतन कॉलेजला बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अॅवार्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच इंजिनिअरींग व पॉलिटेक्निक विभागातील सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. तसेच बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यंग अलायन्स चा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी आपले मनोगत सादर केले. तर सेक्रेटरी नितीन माने यांनी आभार प्रदर्शन केले.
यानंतर सातारा शहारातील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेला दैनंदिन वापराच्या वस्तू बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने प्रदान करण्यात आल्या. यानंतर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचा 29 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विविध कार्यक्रमाचे प्रायोजकत्व श्री ओम स्टील जालना , कालिका स्टील व ग्लोबल हॉलिडे यांनी स्वीकारले होते.
राष्ट्र उभारणी हे उद्दीष्ट ठेवून सरकारी नोकरीत यावे ः ओंकार शेंदूरे ; अभियंतादिनानिमित्त बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचे विविध समाजपयोगी कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES