खटाव : खटाव पासुन जवळच असलेल्या डंगारे वस्ती येथे अडीच एकर उसाचे क्षेत्र विजेच्या तारामध्ये स्पार्कींग झाल्याने अचानक लागलेल्या आगीत ठिबक संचासह उस जळुन गाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली
याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहीती अशी. खटाव पासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या डंगारे वस्ती येथे किशोर डंगारे यांची शेतीआहे. शेतातुन गेलेल्या विजेच्या तारामध्ये वायरींना ताण नसल्याने या विद्युत तारा खालुनच धोकादायक स्थितीत डंगारे यांच्या क्षेत्रातुन गेल्या आहेत याच तारामध्ये स्पार्कींग झाल्याने पडलेल्या ठिणगीने या क्षेत्रात असलेल्या उसाच्या फडाला आग लागली. या आगीत अडीच एकर क्षेत्रातील उस भक्षस्थानी पडला. या वेळी वार्याच्या प्रवाहामुळे या आगीने अधीकच रौद्र रुप धारण केले ही आग बघता बघता संपुर्ण क्षेत्रात पसरली.या उसाला पाणी देण्यासाटी पसरण्यात आलेले ठिबक संचाचे सामानही जळुन खाक झाले.या आगीत डंगारे याचा 200 टण उस जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.