पाटखळ*: सौ. सायली लेंभे-जगताप यांनी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ची मे २०२४ परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंट पदवी मिळवली आहे. जिद्द, चिकाटी, कष्ट आणि सातत्य यांच्या बळावर अतिशय अवघड अशा परीक्षेत त्यांनी हे यश मिळविले आहे.
सायली यांचे प्राथमिक शिक्षण पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, माध्यमिक शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा (निवासी गुरुकुल), महाविद्यालयीन शिक्षण धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा आणि आबासाहेब गरवारे कॉलेज पुणे येथे झाले. इयत्ता ४ थी आणि ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत ही त्यांनी यश मिळवले होते.
पाटखळ ता. सातारा येथील कै. किसन जगताप यांच्या त्या नातसून तसेच श्री. चंद्रकांत जगताप आणि रयतसेवक श्री. मनोहर जगताप यांच्या स्नुषा आहेत. त्यांचे पती सीए कल्याण चंद्रकांत जगताप हे देखील सातारा येथे चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
सीए परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल सौ. सायली लेंभे-जगताप यांचे सातारा, पाटखळ आणि पिंपोडे बु. येथील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.