Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीअडुळ येथे भरघाव वाहनाने पाच जणांना उडविले ; एक ठार, एकजण...

अडुळ येथे भरघाव वाहनाने पाच जणांना उडविले ; एक ठार, एकजण गंभीर तर तिघेजण किरकोळ जखमी

पाटण:- अडुळ ता. पाटण येथे शुक्रवारी रात्री कराड – चिपळूण रस्त्याच्या कडेला वाढदिवसाचा प्लेक्स लावणाऱ्या पाच युवकांना कराड बाजुने भरघाव वेगाणे येणाऱ्या अडुळ गावातीलच ईनोव्हा कारने उडविले. कार चालक दारूच्या नशेत होता असे सांगितले जाते. या अपघातात साहिल दिनकर निवडुंगे हा युवक ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी आणि तिनजण किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री ११. ३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमीवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, एका मित्राच्या वाढदिवसाचा फ्लेक्स कराड-चिपळुण महामार्गालगत २० फुट अंतरावर अडुळपेठ येथे २० ते २५ जण रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान लावत होते. त्यावेळी नवारस्त्याहुन पाटणकडे येणाऱ्या ईनोव्हा कार MH-01 E-1187 या गाडीचालकाने दारुच्या नशेत या तरुणांच्या आंगावर गाडी घातली. यामध्ये पाचजण जखमी झाले.
जखमीना तात्काळ कृष्णा रुगणालय कराड येथे उपचारासाठी दाखल केले. त्यामध्ये साहिल दिनकर निवडुंगे वय- १९ याचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यु झाला. जखमी इतर चार पैकी महेश दत्तात्रय शिर्के वय-१९ गंभीर जखमी झालेला आहे. तर रविंद्र शिवाजी नलवडे वय-२०, गणेश रामचंद्र शिर्के वय १८ व किशोर दत्तात्रय शिर्के वय-१८ हे किरकोळ जख्मी झाले असुन त्यांच्यावरही उपचार करण्यात येत आहेत.
या घटनेची नोंद पाटण पोलिसात झाली असुन ईनोव्हा कार चालक अक्षय विलास डिगे रा. अडुळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने अडुळ गावावर शोककळा पसरली असून शनिवारी दिवसभर गावात तनावाचे वातावरण होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular