(छाया – पुजा भोसले)
खटाव : खटाव ग्रामपंचायतीच्यावतीने खटाव गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केल्याने आता सीसीटिव्ही कॅमेर्याच्या माध्यमातुन टिपल्या जाणार बर्याच काही गोष्टी .
खटाव ग्रामपंचायतीच्या वतीने अती महत्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी हे सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरु केले आहे. त्यानुसार खटाव ग्रामपंचायती पासुन धारपुडी रस्ता, शहाजीराजे महाविद्यालय नजीक असणारा वडुज पुसेगाव रस्त्यावरील चौक, साईबाबा मंदिर, मध्यवर्ती स्टॅन्ड परिसर, अंबेडकर चौक, पेठ लाईन, मराठी शाळा आदि परिसरात हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जे या परिसरात सर्व हालचाली टिपण्यासाठी सज्ज झाले आहेत. या कॅमेर्यांची 80 मीटर पर्यत ़िफ्रक्वेन्सी असुन प्रत्येक कॅमेर्यातुन बारीक सारीक हालचाली टिपल्या जाणार असल्याने आता मात्र सडक सख्याहरी, विघ्नसंतुष्ठ लोकांच्या वागण्यावर या कॅमेर्यामुळे चाप बसणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचेवतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.