Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीचाफळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

चाफळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

सातारा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची  चाफळ ग्रामपंचायत या माझ्या मायभूमीत जयंती साजरी करण्यात येत आहे हे माझे भाग्य आहे असे प्रतिपादन जेष्ठ शिवसैनिक व गावचे सुपुत्र विजयसिह पाटील यांनी चाफळ ता पाटण येथे केले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चाफळ सरपंच सौ अलका पाटील, माजी सरपंच सौ संध्याराणी पाटील, सदस्य उमेश पवार, सोसायटी माजी चेअरमन शिरीष जोशी, शिवसेना पाटण तालुकाप्रमुख बापूराव साळुंखे, श्रीकांत साळुंखे व रिपब्लिकन ब्ल्यू फॉर्सचे मदन खंकाळ ,मान्यवर उपस्थित होते.
चाफळ हे श्रीराम मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पण,1967 साली कोयनेच्या भूकंपात या मंदिराची पडजड झाली त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उद्योगपती अरविद मफतलाल यांना कोयनेत आणले होते. त्यावेळी श्रीराम मंदिराची पडजड पहिली. त्यानंतर लोकनेते व स्थानिक ग्रामस्थांच्या विनंती वरून श्रीराम मंदिर जीर्णोद्धार केला होता. त्याच चाफळ ग्रामपंचायत कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई हे सक्षमपणे प्रतिनिधित्व करीत आहे याचा ही अभिमान वाटत असल्याचेही विजयसिह पाटील यांनी मान्य केले.
प्रारंभी पत्रकार अजित जगताप यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चाफळ ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे विकास कामांना चालना मिळत आहे.2014 साली शिवसेना प्रमुखांची ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा बसविणारी चाफळ ही बहूदा पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे. प्रत्येक मराठी माणसांच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम ठेवला जात असल्याचे यानिमित्त पाहण्यास मिळाले दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक दत्ता पाटिल यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular