सातारा : मोरणा विभागात प्रत्येक गांवामध्ये गत तीन वर्षात डोळयाला दिसतील अशी विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. नाटोशी गावामध्ये गावची सत्ता आपले ताब्यात नसतानाही आपण विकासकामे दिली विविध विकासकामे मार्गी लागल्यानेच नाटोशी गावातील ग्रामस्थांनी गावच्या कारभारामध्ये बदल करुन गावची सत्ता पुन्हा एकदा आपल्या विचारांच्या ताब्यात दिली. अशीच एकी कायम ठेवून नाटोशी गावाप्रमाणे मतदारसंघातील इतर गावांनीही त्यांच्या गांवातील विकास साधून घ्यावा असे आव्हान आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
देसाईवस्ती नाटोशी येथील रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्या सौ.निर्मला देसाई, सदस्य संतोष गिरी, माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील, बशीर खोंदू, पंचायत समिती माजी सदस्य नथूराम कुंभार,ड.मारुती देसाई,गणेश भिसे,संपत कोळेकर,बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.माने या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, गाव तिथे विकास पोहचला पाहिजे या भूमिकेतुन आपण पाटण मतदारसंघामध्ये काम करीत आहोत. मोरणा विभाग आपला बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विभागात माझे आमदारकीच्या या तीन वर्षाच्या कार्यकालात प्रत्येक गांवामध्ये आपण विविध विकासकामे दिली आहेत. अनेक कामे पुर्ण झालीत तर अनेक कामे सुरु आहेत.
नाटोशी गांवामध्ये राष्ट्रीय पेयजलमधून आपण पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करीत आहोत, टकलेवाडीकडे जाणारा रस्ता आपण पुर्ण केला. नाटोशी गावठाण येथे रस्ता व पिण्याच्या पाण्याची योजना व्हावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे याही कामांकरीता निधी उपलब्ध करुन देत आहोत.
अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारी कामे आपण मार्गी लावत असून विरोधकांच्या हातात देण्यासारखे काहीही नसताना चांगल्या चाललेल्या कामांमध्ये खोडा घालण्याचा उद्योग विरोधकांकडून नेहमीच केला जातो.काहीही न करता जनतेमध्ये दिशाभूल करण्यात विरोधक तरबेज आहेत.त्यामुळे आपण केलेल्या कामांची माहिती सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचविणे ही आपली जबाबदारी आहे. मतदारांच्या दारात मते मागायला जाताना विकासाच्या मुद्दयावर आपल्याला मते मागायची आहेत.
आपण केलेल्या विविध विकासकामांचा प्रसार होणे याकरीता गरजेचे आहे. आपण नेमके येथेच कमी पडतो आणि विरोधक मात्र काहीही न करता याचे श्रेय घेवून जातो. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जागृत राहून आपले काम जास्तीत जास्त मतदारांपर्यत पोहचविण्याकरीता कार्यरत रहा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत ड.मारुती देसाई यांनी करुन आभार मानले.