Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीचर्मकारांच्या आवाजाने चांभारगड दुमदुमला चांभारगड उत्सव समितीचा अभिनव उपक्रम

चर्मकारांच्या आवाजाने चांभारगड दुमदुमला चांभारगड उत्सव समितीचा अभिनव उपक्रम

सातारा ः चांभारगड उत्सव समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या गड संवर्धन मोहिमेचे हे दुसरे वर्ष आहे.या वर्षी रविवार रायगड जिल्ह्या महाड तालुक्यातील चांभार खिंड गावात 20/01/2019 रोजी चांभारगड मोहिमेचे आयोजन केले आहे.
चर्मकार समाजाचे भूषण, प्रेरणास्थान असलेल्या 128 चर्मकार समाजाच्या शुरवीर मर्द मावळ्यांना छ. शिवरायांनी गौरविलेल्या या शूरवीरांना वंदन अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन चांभारगड येथे केले आहे. तरी समितीने चर्मकार बंधूंना विजय उत्सवासाठी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.
या विजय उत्सवासाठी समितीने गडावर 1000 लोकांची जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था करणार आली आहे. विजय उत्सव सुरू झाल्यावर जय रोहिदास जय शिवराय या आवाजाने सगळा चांभार खिंड गाव व चांभारगड परिसर उत्सव समितीच्या तसेच चर्मकार समाजामधील हजारो बांधवांच्या आवाजाने चांभार गड दुमदुमला सुमारे शेकडो चर्मकार बांधवानी चांभार खिंड गावातून चांभारगडावर चढण्यास सुरवात केली. तसा चांभारगड पायथ्यापासून वर पाहिला तर सुळकाच दिसतो या गडावर जाण्यासाठी पायर्‍या नाही फक्त पाऊलवाटच ती ही निसरडी पाय घसरला तर थेट खालीच असा हा गड चढण्यास कठीन तरी शेकडो चर्मकार बांधवांनी हा गड जय रोहिदास, जय शिवराय घोषणा देत गडासर केल्यावर आनंदाने तोंडातून बाहेर पडणार्‍या आवाजानी चांभारगड दुमदुमला . त्यानंतर गोरख ननावरे, सुरेश पोटे, जयदेव इसवे, विकास तिखरे, रविराज खरात, बाबासाहेब हंकारे, संजय लोकापुरे, गणेश कांबळे, नितिन कडु,आबा गद्रे, सारिका आगवणे, संतोष शिंदे,सचिन पवार, संजय कारंडे, विपुल कारंडे, शुभम घनवट, संतोष जाधव उपस्थित होते. या मोहिमेत महिलांंचा ही सहभाग होता. गडावर पोहचल्या वर गडाची संपुर्ण स्वच्छता केली. गडावरील असणारे पाण्याचे दगडी हौद ( टाक ) साफ स्वच्छ केली. बारही महिने त्यामध्ये स्वच्छ पाणी असते . त्यानंतर गडावर भगवा झेंडयांचे विधिवत पुजा करुन फडकविला. व नंतर चर्मकार बांधवांनी भगव्याखाली प्रार्थना शपथ घेवून. शुर वीर शहिद झाले त्या चर्मकार बांधवांना अभिवादन केले. या विजय उत्सव समितीचे हे दुसरे वर्ष आहे गड उतार झाल्यावर चांभारखिंड गावातील शाळेत गावातील ग्रामस्थांचा व समितीमधील उत्कृष्ठ काम केलेल्या सदस्यांचा सत्कार केला. आलेल्या शेकडो चर्मकार बांधवांनची जेवण्याची व्यवस्था समितीने केली होती. चांभार गड उस्तव समिती वर्षभरामध्ये अनेक सामाजीक उपक्रम राबवित आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular