चाफळ: एप्रिल ते जून 2019 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजल्याने चाफळ या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीसाठी राजकिय वातावरण तापू लागले आहे.
दि. 21 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागूू करण्यात आली आहे. प्रथमच याठिकाणी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने पहिला लोकनियुक्त सरपंच कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
चाफळ ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहिर झाला असून दि.24 मार्च रोजी मतदान होणार आहे. दि.5 ते 9 मार्च रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. दि. 11 मार्चला अर्जाची छाननी होणार आहे. दि. 13 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. याच दिवशी चिन्हे वाटप तसेच निवडणुक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. 24 मार्चला मतदान व दि. 25 मार्चला मतमोजणी होणार आहे.
चाफळ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला
RELATED ARTICLES