म्हसवड ः क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड मधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी भाटकी येथील जनावरांच्या छावणीस भेट दिली. तसेच छावणीवरील शेतकर्यांना अन्नदानासाठी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दहा हजार रुपयांची मदत देवून समाज कार्यासाठीचा खारीचा वाटा उचलला आहे.
कृषी विकास प्रतिष्ठान संचालित क्रांतिवीर शैक्षणिक संकुल सामाजिक उपक्रमशीलते मुळे अल्पावधीत नावारूपास आले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवगाताचे स्वागत या उपक्रमा बरोबरच नाविन्यपूर्ण असा जनावरांच्या छावणीस भेट देऊन शेतकर्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा उल्लेखनीय उपक्रम मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व त्यांच्या सहकार्यांनी यशस्वी पूर्ण केला. जनावरांच्या छावणीचे व्यवस्थापन; शासकीय मदत; जनावरांचे खाद्य व पाणी पुरवठा; जनावरांचा आरोग्यसुविधा; चारा पेंड इत्यादी बाबतचे व्यवस्थापन या बाबत शेतकर्याकडून विध्यार्थ्यानी माहिती घेतली. तसेच विध्यार्थानी शेतकर्याच्या मुलाखती घेतल्या.
जनावर छावणी मधील शेतकर्यांना अन्नदानासाठी विध्यार्थानी खारीचा वाटा म्हणून दहा हजार रुपयाची मदतही केली. यानिमित्ताने संस्था अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी जनावर छावणी उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल छावणी चालकांचा गौरव केला. व सामाजिक बांधीलकी जपल्याचे स्पष्ट केले.यावेळी छावणी चालक गोरख शिर्के यांना छावणी व्यवस्थे बाबत सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रास्ताविक करून शाळा उपक्रमशीलतेची माहिती दिली.
यावेळी भाटकी पोलीस पाटील हर्षदा शिर्के पाटील; वसंतराव शिर्के; मच्छींद्र शिर्के; उत्तम शिर्के यांचे सह छावणी व्यवस्थापनाचे सर्व संचालक; तसेच शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनावरांच्या छावणीस विद्यार्थ्यांनी भेट देऊन अन्नदानासाठी मदत करण्याची सातारा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे अनेक जेष्ठ शेतकर्याने स्पष्ट केले.
क्रांतिवीरच्या विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी छावणी भेट
RELATED ARTICLES