मेढा प्रतिनिधी – बामणोली (कुडाळ) येथे संपन्न झालेल्या शासकीय तालुकास्तरीय स्पर्धेत कुसुंबी मुरा येथील विद्यार्थिनीनी बुद्धिबळ स्पर्धेत यश प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होत आपले शाळेचे नाव प्रसिद्धी झोक्यात आणले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुंबी मुरा येथील चौदा वर्षाखालील वयोगटात वेदिका पांडुरंग ढेबे (व्दितीय क्रमांक),दिया गोविंद चिकने (तृतीय क्रमांक),नीलम संजय गोरे (चतुर्थ क्रमांक)यांनी बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळवले.
या आधीही कुस्ती स्पर्धेत या शाळेने यश मिळवलं असल्याने येथील विद्यार्थि जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये खेळण्यास उत्सुक झाले आहेत.
या मिळालेल्या यशाबद्दल जावली गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ,विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख विजयकुमार देशमुख तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , माजी अध्यक्ष,सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य यांनी सर्व विदयार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी सर्व विदयार्थी यांना शाळेचे मुख्याध्यापक विनायक चोरट तसेच रत्नाकर भिलारे, जालंदर सुतार, बाळकृष्ण जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
बुद्धिबळ स्पर्धेत कुसुंबी मुरा येथील विद्यार्थिनींनी मिळवले यश
RELATED ARTICLES