पाटण:- छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशन सामाजिक हित जोपासेल. हा कार्यक्रम कोणत्याही राजकिय पक्षाचा नाही तर सामाजिक स्तरावरील आहे.समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांनी तत्पर राहिले पाहिले. असे मत पं.स. माजी सभापती एल् एम् पवार यांनी मांडले.
छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चोवीस तास सात दिवस लोकांना आरोग्य सह सामाजिक सेवेतील तप्तर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाटण येथे छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशन विना शुल्क सभासद नोंदणी कार्यालयाचा शुभारंभ पार पडला त्यावेली ते बोलत असताना पुढे म्हणाले की, समाजातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजकार्य घडणे आवश्यक आहे. हा कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केले त्यांना सामाजिक जाणिव आहे हे दिसुन येते. अनेक शासकिय कार्यालयात सर्वसामान्य लोकांची कामे होत नाहीत त्यांना योजनांचा लाभ घेता येत नाही परंतु अशा संघटनांनी सर्वसामान्य लोकांपर्यंत या योजना पोहचवल्या पाहिजे. राजकारणी लोक हे मत मिलवण्यासाठी काम करत असतात. त्यांच्या कार्यात समाजकारण नसते. सर्वसामान्य लोकांची कामे मार्गी लागली पाहिजे. या संघटनेचे काम चांगले सुरु झाले आहे यामध्ये भ्रष्टाचाराचा वास लागु नये याची कालजी घ्या. मी भ्रष्टाचाराच्या ठिकाणी जात नाही मी पुढारी म्हणुन ही वावरलो नाही. आपल्या कामामध्ये हलगर्जीपणा करू नका आणि मतासाठी संघटनेचा वापर करु नका असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्यावेली रक्तदान शिबीर तसेच कातकरी, वडार समाजातील गरीब कुटुंबांना ब्लैंकेट वाटप करण्यात आले यावेली फौंडेशनचे पाटण तालुका संघटक नितीन पिसाळ, फौंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विक्रम औधकर, सचिव वैभव चव्हाण शिंदे, भाजपच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा आयेशा सय्यद, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, पं स माजी सभापती एल् एम् पवार, प्राणलाल माने, खलीलभाई शेख, माजी सरपंच चंद्रकांत मोरे, यशवंत जगताप, सचिन जाधव, राजेंद्र पाटणकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फौडेशनचे पाटण तालुका संघटक नितीन पिसाल यांनी केले त्यावेली त्यांनी, छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशनच्या माध्यमातून पाटण तालुक्यातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार असुन या बरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन आणि शेती अवजारे, महिला सबलीकरण, जेष्ठ नागरिकांना सुविधा, त्याच बरोबर कला व क्रीडा, वृक्षसंवर्धन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. या साठी चोवीस तास हेल्प लाईन केंद्र सुरू राहणार आहे. तर नागरिकांच्या चोवीस तास सेवेसाठी युवकांची छत्रपती उदयनराजे फोर्स कार्यरत असणार आहे. तसेच २४×७ हे काही राजकिय गणित नाही तर समाजकारणाची सांगड आहे. प्रत्येक वेली राजकारण करत बसण्यापेक्षा थोडं समाजकारण ही केले पाहिजे. आम्ही याअगोदर ही लोकांसाठीच होतो आणि आत्ता ही लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे असे सांगितले.
कार्यक्रम स्थली पाटण तालुक्यातील जास्ती – जास्त नागरीकांनी विना शुल्क सभासद नोंदणी चा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आभार आणि आपले मत भाजपचे तालुकाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर यांनी केले.
छत्रपती उदयनराजे चोवीस तास सात दिवस फौंडेशन सामाजिक हित जोपासेल : एल्. एम्. पवार
RELATED ARTICLES