Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वर पोलिसांची कामगिरी तीन दिवसात अपहरण केलेल्या लहान मुलाला सोडवून आणले

महाबळेश्वर पोलिसांची कामगिरी तीन दिवसात अपहरण केलेल्या लहान मुलाला सोडवून आणले

महाबळेश्वर : मेहवणीच्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला बेळगांव येथे नेहल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून एक पथक बेळगांवला रवाना करण्यात आले होते. महाबळेश्वर पोलिसाच्या कामगिरी मुळे
या पथकाने आरोपी विनोद मोतीलाल पवार याच्या मोबाईल लोकेशन ट्रेस करू त्याच्या जवळ असणारा लहान तीन वर्षाचा मुलगा विराज याला पोलिसांनी चालाकीने आरोपी विनोद मोतीलाल पवार याच्या ताब्यातून सुखरूप सुटका केली परंतु आरोपी विनोद पवार हा फारार झाला.
याबाबत महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की आहे फिर्यादी कांचन जयेश पवार रा मेट गुताड यांनी दिली या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद पवार याची पत्नी कोमल पवार व अडीच वर्षांची मुलगी समृद्धी या दोघी जणी मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता आहेत पत्नी कोमल व समृद्धी ला मेहुणी कांचन पवार हिनेच बेपत्ता केल्याचा संशय विनोद याला होता.या संशयावरून त्याने मेहुणीच्या मुलाचेच अपहरण करण्याचा डाव आखला होता परंतु आरोपीची पत्नी व मुलगी या दोघी शिर्डीला गेल्या होत्या त्यांनी मोबाईल वरून आम्ही शिर्डी मधून निघत आहे असा फोन आरोपी विनोद पवारला केला या दोन्ही फोनचे लोकेशन ट्रेस केल्यावर कराड (मसूर) येथील लोकेशन दाखवले व पोलिसाच्या पथकाने सापळा लावून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी एच पावरा भूजंगराव काळे यांनी आरोपी विनोद पवार हा मुलाला घेऊन बेळगावच्या दिशेने निघाला होतो व त्याची पत्नी न मुलगीची शिर्डी वरून येण्यासाठी कराड(मसूर) येथे अंधारात वाट पाहत बसला होता याच वेळी पोलिस पथकाने. मुलगा विराज त्याच्याकडून सुखरूप घेतले पण अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाला फरार आरोपीचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक एम एस निंबाळकर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक डी एच पावरा पोलिस हवलदार चंद्रकांत तिटकारे व भूजंगराव काळे करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular