Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजमिनीच्या हव्यासापोटी चिमुकल्याचा गळा दाबून खून

जमिनीच्या हव्यासापोटी चिमुकल्याचा गळा दाबून खून

पांडुरंग घाडगेस अटक; सपकळवाडीत हळहळ
फलटण : सपकळवाडी, (ता. फलटण) येथे जमिनीच्या हव्यासापोटी सात वर्षीय चिमुकल्याचा नात्याने असलेल्या काकाने गळा दाबून खून केला आणि मृतदेह विहीरीत फेकून देण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, कल्पेश भाऊसो सपकळ (वय 7) रा. सपकळवाडी, ता. फलटण) हा दि. 30 जानेवारी पासून बेपत्ता होता. कल्पेशची आई रंजना भाउसो सपकळ यांनी अज्ञात आरोपीने कल्पेशला पळवून नेल्याची तक्रार दि. 31 जानेवारी रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्या अनुषंगाने फलटण पोलिस ठाण्याचे पोलिस शोध घेत होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गावातील काही लोकांनी कल्पेश यास संशयित पांडुरंग सदाशिव घाडगे (वय 37, रा. सपकळवाडी, ता. फलटण मुळगाव (चिंचणी, ता. खटाव ) याच्या सोबत पाहिले होते तसेच त्याचा पूर्व इतिहास गुन्हेगारी विश्वाचा असल्याचे समजले होते. या माहितीवरून पोलिसांनी संशयित पांडुरंग घाडगे यास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
जमिनीच्या हव्यासापोटी दि. 30 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कल्पेश यास वडापाव खायला देतो असे आमिष दाखवून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पळवून नेऊन त्याचा सपकळवाडी येथील ओड्या कडेला असलेल्या शेताजवळ नाक तोंड गळा दाबून कल्पेशचा खून केला आणि पुरावा नाहीशा करण्याच्या उद्देशाने त्याच वेळी मृतदेह विहीरी मध्ये टाकून दिला. पोलिसांनी घाडगे सोबत जाऊन विहिरीमध्ये पाहिले असता कल्पेशचा मृतदेह आढळून आला. पांडुरंग घाडगे यास अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बोंबले करीत आहे. चिमुकल्याच्या खुनाच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular