फलटण : श्री सद् गुरू चिले महाराज यांचा पायी पालखी रथ सोहळा श्री क्षेत्र जेऊर पैजारवाडी जि.कोल्हापुर ते श्री.दत्त मंदीर संस्थान श्री क्षेत्र मोर्वे ता.खंडाळा जि.सातारा असा होणार आहे. श्री.सदगुरु चिले महाराज श्री क्षेत्र मोर्वे येथे प्रथम आले तो दिवस म्हणजे 26 जानेवारी या दिवशी सर्व भक्तगण आगमन दिन म्हणून साजरा करतात त्या प्रित्यर्थ हा पालखी सोहळा साजरा केला जातो.
या वर्षी या पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगवार दिं 15 जानेवारी रोजी श्री क्षेत्र जेऊर येथे श्री.भैरवनाथ व श्री मसाई देवी यांना अभिषेक करून प्रस्थान व मुक्काम जेऊर येथे दिं 16 रोजी श्री क्षेत्र पैजारवाडी मार्गे सिध्देश्वर महराज मंदीर राजघाट कोल्हापुर येथे मुक्काम दिं.17 रोजी सिद्धेश्वर महाराज मंदिर येथुन प्रस्थान कोल्हापुर येथे श्रीच्या रथाची भव्य मिरवणुक त्र्यंबोली माता टेंबलाई मंदिर कोल्हापूर येथे मुक्काम दि.18 रोजी सकाळी टेंबलाई मंदिर येथून प्रस्थान प्राथमिक शाळा येथे दुपारचा महाप्रसाद व हनुमान मंदिर वाठार येथे मुक्काम दि.19 रोजी श्री दत्त मंदीर कामेरी येथे दुपारचा प्रसाद ते फेरो स्टील पाटील ब्रदर्स पेठ नाका येथे मुक्काम दि.20 रोजी श्री नवानाथ मंदीर वाठार येथे दुपारचा महाप्रसाद कराड नगर परीषद येथे मुक्काम दि.21 रोजी वराडे येथे नर्सरी फार्म येथे दुपारचा महाप्रसाद त्यांनतर गांधीनगर काशीळ श्री दत्त मंदीर येथे मुक्काम दिं.22 रोजी अजिंक्यतारा सह.साखर कारखाना येथे दुपारचा महाप्रसाद तेथुन पोलीस करमणुक केंद्र जिल्हा तालीम संघ सातारा येथे मुक्काम दिं23 रोजी लिंबफाटा येथे दुपारचा महाप्रसाद तेथुन मराठी शाळा उडतारे येथे मुक्काम दि24 रोजी कृष्णाईमातेत श्रीच्या पादुकांना स्नान व भुईजमध्ये भव्य मिरवणुक सुरूर फाटा येथे दुपारचा महाप्रसाद राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे मुक्काम दि.25 रोजी बाळसिध्दनाथ मंदीर म्हावशी येथे दुपारचा महाप्रसाद श्री कळभैरवनाथ अहीरे येथे मुक्काम दि.26 रोजी अहीरे येथुन पालखी रथ सोहळा मिरवणुक श्री क्षेत्र दत्त मंदीर मोर्वे येथे मुक्काम कै.हरीभाऊ आनंदराव चव्हाण माजी अध्यक्ष श्री दत्त मंदीर मोर्वे यांच्या स्मरणार्थ दिं 26 जानेवारी रोजी भव्य ढोल लेझिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भक्तांनी या पायी पालखी सोहळ्या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री.दत्त मंदीर संस्थान मोर्वे ट्रस्ट्रच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सद् गुरु चिले महाराज पायी पालखी रथ सोहळा 15 जानेवारी पासून
RELATED ARTICLES