निमसोड : चितळी (ता. खटाव) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त पंचशिल सेवा संस्था चितळी, कराड रोटरी क्लब, कोकुयो रिध्दी पेपर प्रोडक्ट लि. कंपनीच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी निवृत्त पोलीस महासंचालक रामराव फडतरे, माजी उपसरपंच काकासाहेब मदने, मुंबई एम.आय.एम. चे सचिव रत्नाकर डावरे, प्रा. हणमंत डावरे, शांतिलाल डावरे, जयवंत डावरे, रामराव भिसे , श्री. सुखदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिमापूजनानंतर डॉ. बाळासाहेब कर्पे यांचे डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात राटरी क्लबच्या सहकार्याने आरोग्य शिबीर झाले. या शिबीरात सुमारे 150 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तद्नंतर कोकुयो पेपर कंपनीच्या वतीने दलित समाजातील 210 गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महापुरुषांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री महिलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, फनी गेम्स व कराड येथील सरोदे बंधूंचा भिमगित गायनाचा कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
चितळी येथे विधायक उपक्रमांनी संयुक्त जयंती सोहळा
RELATED ARTICLES