Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीचोराडेनगरी दुमदुमली : यात्रेत गुलाल खोबर्‍याची उधळण : हजारो भाविकांची उपस्थिती

चोराडेनगरी दुमदुमली : यात्रेत गुलाल खोबर्‍याची उधळण : हजारो भाविकांची उपस्थिती

म्हासुर्णे : भैरोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करित सासणकाठयांच्या डौलात, फटाक्याची आतिषबाजी, घोडे, लेझिम सनईच्या तालावर गुलाल खोबर्‍याची उधळण करित श्री भैरवनाथाचा पालखी सोहळा सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यत चोराडे ( ता.खटाव ) येथे मिरवणुक काढण्यात आली.
चोराडेच्या भैरवनाथाची पालखी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. चोराडे गावातील व परिसरातील 10 ते 15 गावातील ग्रामस्थ भक्तीभावाने याञेत सहभागी होतात.या पंचक्रोशीतील कामानिमित्त बाहेरगावी असणारा वर्ग आपल्या कुटुंबासहित हजेरी लावतो.आष्टमीदिवशी चोराडे गावातील मानाच्या सासनकाठीसह पालखी सोहळा काढला जातो.गुलाल खोबर्‍याच्या आदल्यादिवशी गावातुन छबीना सनई चौघड्या गजरात तसेच लेझीम गजी फटाक्याची आतषबाजीसह सासन काठ्यांचा सोबत काढला जातो.
यात्रेच्या मुख्य दिवशी मंदिराजवळ गावातील भाविकांकडून प्रसादाचे आयोजन करण्यात येते.तसेच मुख्य दिवशी पहाटे देवाचा अभिषेक व पुजा करुन पहाटे 6 वाजता मंदिरातुन बाहेर गुलाल खोबर्‍याची उधळण करण्यासाठी आणली जाते. यावेळी भाविक भैरोबांच्या नावानं चांगभलंचा गजर करतात.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular